esakal | शिवसेनेचा सर्वात मोठा गड हिसकवण्यासाठी भाजपचं 'मिशन मुंबई'
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचा सर्वात मोठा गड हिसकवण्यासाठी भाजपचं 'मिशन मुंबई'

बिहारच्या निकालानंतर आता राज्यातील भाजप नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकांकडे लक्ष घातलं आहे. आज या संदर्भात मुंबई भाजप कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडणार आहे. 

शिवसेनेचा सर्वात मोठा गड हिसकवण्यासाठी भाजपचं 'मिशन मुंबई'

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः भाजपनं बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवत भरघोस यश मिळवलं. आता या विजयानंतर भाजपनं महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला आहे. बिहारच्या निकालानंतर आता राज्यातील भाजप नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकांकडे लक्ष घातलं आहे. आज या संदर्भात मुंबई भाजप कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडणार आहे. 

बिहारच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही उमटताना दिसले. बिहारमध्ये झालेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या रणनीतीचंही कौतुक करण्यात आलं. त्यामुळे भाजपनं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे.

मुंबईत आज भाजपाच्या कार्यकारणीची बैठक आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही बैठक असेल. मुंबईत अनेक वर्षापासून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. या बैठकीच्या माध्यामातून भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचं रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे.

अधिक वाचा-  रुग्णांचा आकडा आटोक्यात, ठाण्यात सहा कोविड सेंटरसह क्वॉरन्टांईन सेंटरही बंद

या बैठकीत मुंबईतील भाजपा नगरसेवक, पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.  या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांची उपस्थितीत असेल. 

अधिक वाचा-  नवी मुंबईत लक्झरी बस आऊट ऑफ कंट्रोल, थेट भिंतीला धडक

मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. तसंच अनेक वर्ष मुंबई पालिकेत शिवसेना- भाजप युतीची सत्ता होती. मात्र गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेचे 92 तर भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले होते. मात्र राज्यातील सत्तेत एकत्र असल्याने भाजपने त्यावेळी मुंबईत महापौर बसवण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपनं शिवसेनेला विरोध किंवा पाठिंबा अशी कोणत्याच प्रकारची भूमिका घेतली नव्हती. मुंबई महापालिकेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. 

Upcoming bmc election bjps Set mission mumbai target shivsena

loading image
go to top