मुंबईत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा लस टोचून घेण्यास अल्प प्रतिसाद

पूजा विचारे
Wednesday, 20 January 2021

पुन्हा लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा लस टोचून घेण्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय.

मुंबईः  कोविन ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. मंगळवारपासून पुन्हा कोविडचे लसीकरण सुरु झालं आहे. मात्र आता आठवड्यातून चार वेळा लसीकरण होणार आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत लसीकरण होईल. पहिल्या दिवशी महानगर पालिकेने चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात १ हजार ९२६ जणांना लस देण्यात आली. दरम्यान पुन्हा लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा लस टोचून घेण्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय.

नोंदणी झालेल्या ३२०० ऐवजी १५९७ कर्मचाऱ्यांनीच काल लस घेतली आहे. १६ तारखेला मुंबईत १९२६  जणांना लस देण्यात आली होती. त्यानंतर अॅपमधील तांत्रिक अडचणीमुळे २ दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. काल १९ तारखेला पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत काल लसीकरणाची नोंदणी 

  • केईएम रुग्णालयात ३०७  
  • टिळक रुग्णालयात ११०
  • कूपर रुग्णालयात २२९
  • नायर रुग्णालयात १६५
  • व्ही. एन. देसाई रुग्णालयात ५९
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात २३६ 
  • राजावाडी रुग्णालयात २८५
  • वांद्रे भाभा रुग्णालयात ९०
  • बीकेसी कोविड सुविधा केंद्रात ९०
  • जेजे रुग्णालयात १३

अशा एकूण १ हजार ५९७ जणांना लस दिल्याची माहिती आहे. 

प्रत्येक केंद्रावर ४०० जणांना लस देण्याचं धोरण ठेवण्यात आलं आहे. या १० केंद्रांवर ४ हजार जणांना लस देणं त्यानुसार क्रमप्राप्त होतं. पण ८०० जणांची नावं दुबार आल्यानं त्यांची नाव वगळण्यात आली होती. त्यानंतर ३ हजार २०० जणांचं लसीकरण करण्यात येणार होतं. मात्र फक्त १ हजार ५९७ जणांनी काल केंद्रावर हजेरी लावून लस टोचून घेतली आहे.

हेही वाचा- सायन रुग्णालयातून ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस न घेताच पाठवलं घरी

 Mumbai less response from medical staff Corona vaccination


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai less response from medical staff Corona vaccination