BMC आयुक्त इक्बालसिंह चहल यांची अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती

तुषार सोनवणे
Friday, 6 November 2020

मुंबई महापालिकेच आयुक्त इक्बालसिंह चहल यांना राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती देण्यात आली आहे.

मुंबई - मुंबई महापालिकेच आयुक्त इक्बालसिंह चहल यांना राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती देण्यात आली आहे. आयुक्त चहल यांनी मुंबई सारख्या कठीण शहरात कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उत्तम कामची ही पावती असल्याचे बोलले जात आहे.

राज्यपालांना पाठवलेल्या यादीत कोणत्या उमेदवारांची नावे? 

मुंबई महापालिकेच आयुक्त आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून ख्याती असलेले इक्बालसिंह चहल यांनी कोरोना काळात मुंबईला सावरले. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक प्रशासनात होत आहे. धारावी सारख्या कठीण ठिकाणी त्यांनी कोरोना आटोक्यात आणून जागतिक आरोग्य संघटनेचेही लक्ष वेधले. त्यांची आता राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती देण्यात आली आहे. असे असले तरी ते मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कायम राहणार आहेत. त्यामुळे त्यांना दोन्ही जबाबदाऱ्यांचा भार उचलावा लागणार आहे.

Appointment of BMC Commissioner Iqbal Singh Chahal as Additional Chief Secretary


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of BMC Commissioner Iqbal Singh Chahal as Additional Chief Secretary of Maharashtra

टॉपिकस