
अखेर काटोलच्या भारत राखीव बटालियनला मंजुरी
मुंबई : काटोल येथे मोठी बटालीयन व्हावी अशी ईच्छा अनिल देशमुख यांची होती. यासाठी महीला बटालीयनचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु यात काही तांत्रीक अडचणी येत असल्याने भारत राखीव बटालियन व्हावी यासाठी अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार केला होता. ही बटालियन मंजुर होण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सात्यत्याने प्रयत्न सुरुच ठेवले होते. गुरुवारला मंत्रालयात या संर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यात काटोल तालुक्यातील इसासनी येथे भारत राखीव बटालियनला ५ ला मंजुरी देण्यात आली असून तसा शासन निर्णय सुध्दा काढण्यात आल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली. या निर्णयाबदल सलील देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.
काटोल तालुक्यात बटालीयन होण्यासाठी अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले होते. यासाठी ईसासनी येथे १२० एकर शासकीय जमीन सुध्दा हस्तातरीत करण्यात आली होती. येथे महिला बटालीयन होण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. त्यास मंजुरी सुध्दा देण्यात आली होती. परंतु मध्यतरी यात काही तांत्रीक अडचणी येत गेल्यामुळे भारत राखीव बटालियन चा प्रस्ताव समोर आला. सुरुवातीला ही बटालियन अकोला जिल्हातील शिसा उदेगाव व हिंगाणा शिवारात होणार होती. परंतु येथे जमीन उपलध्द होत नसल्याने या बटालियनचा प्रस्ताव धुळखात पडला होता. नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असुन देशाच्या मध्यवर्ती आहे. सदर भारत राखीव बटालियन हे केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील असल्याने त्यांची गरज देशात इतरत्र लागल्यास तातडीने इतर राज्यात तैनातीसाठी पाठविण्यास सुकर होण्यासाठी ती अकोला एैवजी नागपूर येथे घेण्याचा प्रस्ताव समोर आला.
नागपूर शहर हे मध्यवर्ती ठिकाण असुन दळणवळणा करीता रेल्वे, विमान व महामार्ग यांनी जोडले असल्याने प्रवासाच्या दुष्टीने सोयीस्कर आहे. भारत राखिव बटालीयण मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या कंपन्या वारंवार पूर्ण संख्याबळासह नक्षल बंदोबस्त, आंतर सुरक्षा बंदोबस्त , राज्याबाहेरील बंदोबस्ता करीता पाठविण्यात येतात. अशा परिस्थीतीत भारत राखिव बटालियन ५ याचे कार्यालय नागपूर येथे असल्यास सोईच होणार आहे. ही बटालियन काटोल येथे होण्यासाठी गृहमंत्री असतांना अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले होते. या बटालिनचा पाठपुरावा सलील देशमुख सात्यत्याने घेत होते. यासाठी गुरुवारला मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गृह सचीव आनंद लिमये, पोलिस हॉवसींगचे पोलिस महासंचाल विवेक फणसाळकर, संजय वर्मा, पंकज डाहाने, एस. आर. पी. एफ चे एडीजी चिरंजीव प्रसाद, नागपूरचे विषेश पोलिस महानिरीक्षक शेलींग दोरजे, नागपूर ग्रामिणचे अधिक्षक मगर, सलील देशमुख अपुन खराडे, शब्बीर शेख, माणीक नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थीत होते.
या बैठकीत सर्व तांत्रीक अडचणीवर चर्चा करण्यात आली. जागा हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सुध्दा तयार करण्यात आला असून २२ मार्च २०२२ ला आदेश सुध्दा काढण्यात आल्याचे या बैठकीत समोर आले. सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर अकोला येथील मंजुर पदांसह व मंजुर आवर्ती / अनावर्ती खर्चासह भारत राखिव बटालियन क्र. ५ ला काटोल तालुक्यातील ईसासनी येथे स्थापन करण्याची मान्यदा देण्यात आली. लागलीच तसा शासन निर्णय सुध्दा काढण्यात आला. भारत राखीव बटालियन क्र. ५ ला काटोल येथे मान्यता दिल्याबदल सलील देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठकारे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील ईसासनी येथील याच जागेवर भारत राखीव बटालियन क्र. ५ होणार आहे.
Web Title: Approval Was Given To Katol India Reserve Battalion Anil Deshmukh Salil Deshmukh Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..