esakal | पावसाळ्यात डास आणि माश्यांपासून कोरोनाचा धोका असतो का? वाचा तज्ज्ञांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात डास आणि माश्यांपासून कोरोनाचा धोका असतो का? वाचा तज्ज्ञांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती

पावसाळ्यात डास तसेच माश्यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाचा प्रदुर्भाव ही वाढेल अशी भिती पसरली आहे.

पावसाळ्यात डास आणि माश्यांपासून कोरोनाचा धोका असतो का? वाचा तज्ज्ञांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई - पावसाळ्यात डास तसेच माश्यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाचा प्रदुर्भाव ही वाढेल अशी भिती पसरली आहे. मात्र डास आणि माशांपासून कोरोना संसर्ग पसरत ऩसल्याने त्यापासून कोरोनाचा धोका नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. मात्र डास-माश्यांपासून पसरणा-या आजारापासून काळजी घेण्याचे आवाहन ही त्यांनी पुढे केले.  

'कोरोना रिकव्हरी'त ठाणे शहराचा डंका; देशासह राज्यात किती क्रमांक पटकावला? वाचा सविस्तर

कोरोना विषाणू हा एअर बॉर्न असून ड्रॉपलेट्सच्या (तृषार)च्या माध्यमातून पसरतो. तर डास - माशी यांपासून पसरणारे आजार  या व्हेक्टर बॉर्न प्रकारत मोडतात. त्यात डास एखाद्या व्यक्तीला चावतांना त्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त शोषतो. त्यानंतर जेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा तो ते रक्त त्याच्या शरीरात सोडतो. त्यापासून डेंग्यू,मलेरिया सारखे आजार पसरू शकतात. त्याच प्रमाणे माशीच्या पंख आणि पायाच्या माध्यमातून बॅक्टरीयल आजार पसरत असल्याचे संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.

सध्या सर्दी,खोकला,तापाची साथ असल्याने लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला ताप येत असल्यास त्याने तो अंगावर काढू नये किंवा तापाचे निदान डॉक्टरला न दाखवता स्वताच करू नये. एखादा ताप हा  मलेरिया,डेंग्यू आहे की कोरोना हे चाचणी केल्याशिवाय स्पष्ट होत नाही. त्यामुळे लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन ही भोंडवे यांनी केले आहे. नागरिकांनी सर्दी,खोकला,ताप असेल तर घरच्या घरी औषधोपचार घेणे टाळावे. तसेच योग्य सामाजिक अंतर पाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा असा सल्ला डॉ भोंडवे यांनी दिला.

*पावसाळ्यात डास-माश्यांमुळे पसरणारे आजार

 • -मलेरीया
 • -डेंग्यू
 • -डीसेंट्री
 • -टायफाईड
 • -कॉलरा
 • -गॅस्ट्रोइंट्रीटीस
 • *अशी घ्या काळजी
 • -घर,परिसर स्वच्छ ठेवा
 • -सायंकाळच्या वेळी दार,खिडक्या बंद ठेवा
 • -मच्छरदानीचा वापर करा
 • -इंसेट रेपेलंट स्प्रे चा वापर करा

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top