पीएमसी बँकेचे लाभार्थी आहात का? किरीट सोमय्या यांची राऊत यांना विचारणा

कृष्ण जोशी
Sunday, 27 December 2020

पीएमसी बँक प्रकरणाचे तुम्ही लाभार्थी आहात का, हे आधी स्पष्ट करा, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

मुंबई ः पीएमसी बँक प्रकरणाचे तुम्ही लाभार्थी आहात का, हे आधी स्पष्ट करा, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

राऊत यांच्या पत्नीला आज ईडीची नोटीस आल्याप्रकरणी ते बोलत होते. पीएमसी बँकेत आपले पैसे अडकलेल्या दहा लाख खातेदारांसह सर्वांनाच त्या बँकेचे पुनरुज्जीवन हवे आहे. त्यामुळे ईडीला कोणतीही माहिती हवी असल्यास तिला राजकीय रंग देणे योग्य नाही असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 राऊत यांच्या पत्नीला आज पीएमसी बँक प्रकरणी ईडीची नोटीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या संजय राऊत हे विविध मार्गांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही नोटीस आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यासंदर्भात सोमय्या यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

राऊत यांचे कुटुंबीय पीएमसी बँकेचे लाभार्थी आहेत का, यापूर्वी त्यांना या प्रकरणी कोणतीही चौकशीची नोटीस आली होती का, हे त्यांनी स्पष्ट करावे. कोणीही या नोटिशीला राजकीय रंग देऊ नये असेही सोमय्या यांनी म्हटले आहे

Are you a beneficiary of PMC Bank? Kirit Somaiyas question to Raut

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are you a beneficiary of PMC Bank? Kirit Somaiyas question to Raut