सावधान ! वेबसिरिज, ऑनलाईन चित्रपट डाऊनलोड करताय? त्याआधी हे वाचा, अन्यथा...

free movies
free movies

मुंबई : लॉकडाऊनमध्ये वेब सिरीज, नाटक, चित्रपट, गाणी डाऊनलोड करत असाल तर सावधानता बाळगा, अशा सूचना राज्य सायबर विभागाने दिले आहेत. अनधिकृत लिंक आणि सबस्क्रिप्शनच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता सायबर विभागाने वर्तवली आहे. 

लॉकडाऊनमध्ये घराघरात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बरेच नागरिक वेब सिरीज, नाटक, चित्रपट व गाणी मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करत आहेत. एखाद्या चुकीच्या किंवा फेक संकेतस्थळावरील मोफत वेबसिरीज, नाटक, चित्रपट बघण्यासाठी त्यावर क्लिक केल्यास तुमचा संगणक अथवा मोबाइलवर एखादे घातक मालवेअर डाऊनलोड होऊन ते हॅक होऊ शकतात, असा इशारा सायबर विभगाने दिला आहे. त्यामुळे असे मोफत वेबसिरीज, नाटक, चित्रपट, गाणी एकण्यापुर्वी किंवा संकेतस्थळावर सबस्क्रिप्शन भरण्याआधी ते संकेतस्थळ अधिकृत आहे का, याची खात्री करून घ्या अथवा तुमच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डची माहिती सायबर भामट्यांच्या हाती लागू शकतात, असे सायबर विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व वेबसिरीज, नाटक, चित्रपट हे अधिकृत वेबसाईटवरच बघावे तसेच, गाणीही अधिकृत वेबसाईटवरूनच डाउनलोड करावे, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.

राज्यात 395 सायबर गुन्हे
लॉकडाऊनच्या इंटरनेटवरील गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात 395 गुन्हे दाखल केले आहेत. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारासंदर्भात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये  दाखल 395 गुन्ह्यांपैकी 17 गुन्हे अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. 

  • आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस - 169 गुन्हे 
  • आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स - 154 गुन्हे 
  • टिकटॉक व्हिडिओ - 18 गुन्हे 
  • आक्षेपार्ह ट्विट - 7 गुन्हे
  • आक्षेपार्ह इंस्टाग्राम पोस्ट - 4 गुन्हे 
  • अन्य समाज माध्यमांचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी 43 गुन्हे दाखल. 
  • आतापर्यंत 211 आरोपींना अटक
  • एकूण 102 आक्षेपार्ह पोस्ट्स हटवल्या

are you download Webseries, movies, Be careful Partial fraud

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com