डोंगरीतील अंमली पदार्थप्रकरणी आरिफ भुजवालाच्या NCB ने आवळल्या मुसक्या

अनिश पाटील
Monday, 25 January 2021

डोंगरी येथील अंमली पदार्थ कारखाना चालविणारा आरिफ भुजवाला याला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली

मुंबई - डोंगरी येथील अंमली पदार्थ कारखाना चालविणारा आरिफ भुजवाला याला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. एनसीबीने आजवर केलेली ही सर्वात मोठी कामगिरी आहे. काही दिवसांपूर्वी आरिफच्या घरावर एनसीबीने कारवाई केली होती. यात कोट्यवधी रुपयांची रोकड आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तो दुबईतील कैलास राजपूत याच्या संपर्कात होता. कैलास हा दुबईतून हा व्यवसाय हाताळत असल्याचे कळते.

याआधीच्या एनसीबीच्या कारवाईदरम्यान मुख्य आरोपी आरिफ भुजवाला पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पोलीस चौकशीत आरिफ आणि त्याच्या साथीदारांनी गेल्या पाच वर्षांत दीड हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ विकल्याचे उजेडात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणसह तिघांना अटक करण्यात आली होती. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आरिफला रायगड परिसरातून अटक करण्यात आली. आरिफच्या अटकेमुळे दाऊद टोळीचे अनेक आरोपी आता एनसीबीच्या निशाण्यावर आहेत. आरिफच्या घरात मिळालेल्या डायरीतून अनेक बडी नावे उघड झाली आहेत. अमली पदार्थाच्या तस्करीतून दाऊद आणि त्याच्या हस्तकांनी कमावलेली संपत्तीही जप्त केली जाणार आहे. याशिवाय या सर्व गुन्ह्यांसंदर्भाची माहिती ईडी आणि एनआयएलाही दिली जाणार असल्याची माहिती एनीबीचे अधिकारी समीर वानखडे यांनी दिली. 
Arif Bhujwala arrested in ban chemical case

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arif Bhujwala arrested in ban chemical case