अर्णब गोस्वामी पुन्हा गैरहजर! "कारणे दाखवा'साठी पोलिसांत येणे टाळले

अनिश पाटील
Saturday, 24 October 2020

"रिपब्लिक' टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात चॅप्टर केसच्या प्रक्रियेला मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे.

 
मुंबई ः "रिपब्लिक' टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात चॅप्टर केसच्या प्रक्रियेला मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत "कारणे दाखवा' नोटीस बजावून आज हजर राहण्यास सांगितले होते; पण गोस्वामी यांनी सलग दुसऱ्यांना या प्रक्रियेला येणे टाळले. दरम्यान, बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याप्रकरणी "रिपब्लिक'चे वार्ताहर व अँकरविरोधात दाखल गुन्ह्याप्रकरणी त्यांनी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याला आज सकाळी भेट दिली. 

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त ट्‌विट करणाऱ्याची याचिका न्यायालयाकडून नामंजूर!

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याशिवाय रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी अर्णब गोस्वामीविरोधात गुन्हा दाखल केला होता. गोस्वामी यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बंधपत्र का घेऊ नये, यासाठी गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यासाठी 16 ऑक्‍टोबरला दुपारी 4 वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते; पण गोस्वामी यांनी या नोटिसीला उत्तर दिले व या प्रक्रियेला गैरहजेरी दर्शवली. त्यनंतर गोस्वामी यांना पुन्हा आज बोलवले होते. त्याला गोस्वामी यांच्या वकिलांनी गोस्वामी येऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार पुढील सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार आहे. 

अंबरनाथमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला; चारही हल्लेखोर अर्ध्या तासांत जेरबंद

दरम्यान, उपसंपादक शावन सेन व कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी यांचे मनोबल वाढवण्यासाठी गोस्वामी यांनी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात त्यांच्यासोबत गेले. पोलिस खाते व पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर नुकताच ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  

 
-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arnab Goswami absent againto the police for show cause