अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया

अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबईः रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. महाराष्ट्रात सर्वकाही कायद्यानुसार चालतं. अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचा ठाकरे सरकारशी काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 

या कारवाईचा कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध आणि सरकारचा संबंध नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.  मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलिस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.  संजय राऊत यांनी गोस्वामी यांच्यावरील कारवाईचं समर्थन केलं आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. त्याच्याशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचं कारण नसल्याचंही संजय राऊत म्हणालेत. 

हा काळा दिवस नाही- राऊत 

गोस्वामी यांना अटक केल्यानंतर पत्रकारितेसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी पत्रकारितेसाठी काळा दिवस नसल्याचं सांगितलं. तसंच राज्यात पत्रकार आणि पत्रकारिता अशा कुणालाही धोका नसून आम्हीही पत्रकार आहोत, असं म्हणत चुकीचं काही केलं नसेल तर जोरजोरात ओरडण्याची गरज लागत नाही, असा टोला राऊत यांनी गोस्वामींना लगावला आहे. 

अर्णब गोस्वामी यांना अटक का?

मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले होते.  ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.  नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

Arnab Goswami arrested Shiv Sena MP Sanjay Raut reaction after the arrest

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com