SSR Case: मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी तब्बल दीड लाख फेक अकाऊंट

SSR Case: मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी तब्बल दीड लाख फेक अकाऊंट

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत होते. मात्र या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसंच मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई पोलिसांना टार्गेट करण्यात येत होतं. या प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर फेक अकाऊंट बनवल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी करण्याची मोहिम सुरु करण्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई पोलिस आणि राज्य सरकारला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर BOTS चा वापर करण्यात आला होता. सोशल मीडियावर दीड लाखांहून अधिक बनावट अकाऊंट तयार करण्यात आले, अशी माहिती मुंबई पोलिसांनी केला होता.

सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्यामार्फत चौकशी सुरु करण्यात आली होती, त्याचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालानुसार, चीन, हॉंगकॉंग, नेपाळ या देशातून BOTs माध्यमातून बदनामीची ही मोहिम चालवण्यात आल्याचं समजतलंय.

या प्रकरणात  ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. #JusticeForSSR, #SushantConspiracyExposed, #justiceforsushant, #sushantsinghrajput #SSR  असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले होते. 

 मुंबई पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. या बनावट खातेधारकांवर आयटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत.

SSR Case As many as 1 lakh 50 thousand fake accounts defame Mumbai Police

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com