esakal | Lockdown ची दहशत! टॅक्सी चालकांनी उचललं टोकाचं पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

taxi driver left mumbai

Lockdown ची दहशत! टॅक्सी चालकांनी उचललं टोकाचं पाऊल

sakal_logo
By
प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्य शासनाच्या नवीन निर्बंधांमुळे आता पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस पंप आता 7 ते 11 वाजेपर्यंतच उघडे राहणार आहे. त्यामुळे आधीच विविध निर्बंधांमुळे टॅक्सीचा प्रवासी व्यवसाय ठप्प झाला असून पुरता आर्थिक अडचणीत सापडला आहे. परप्रांतीय टॅक्सी चालक आपले वाहन मुंबईच्या रस्त्याच्या कडेला उभे करून गावी परतले आहे. जवळपास 75 टक्के टॅक्सी चालक आपल्या मूळ गावी परतले आहे. कमी उत्पन्न आणि लॉकडाऊनच्या धास्तीनं चालकांनी मुंबई सोडली. आता सुमारे 5 हजार टॅक्सी शहराच्या रस्त्यावर अशाच उभ्या आहेत, असं टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए एल क्वॉड्रोस यांनी सांगितलं आहे.

मुंबईत एकूण 60 हजारापेक्षा जास्त टॅक्सी चालक आहे. त्यापैकी 85 टक्के टॅक्सी चालक परप्रांतीय आहे. स्थानिक मराठी टॅक्सी चालकांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे परप्रांतीय टॅक्सी चालक आपल्या राज्यात परतल्याने मुंबईतील रस्तोरस्ती टॅक्सीच्या रांगा दिसून येत आहे. मात्र, स्थानिक मराठी टॅक्सी चालक अद्याप कोरोनाच्या काळातही आपली सेवा सुरू ठेवली आहे. मात्र, दोनच प्रवाशांची वाहतूक आणि गॅस पंप सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच सुरू राहत असल्याने टॅक्सी चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

हेही वाचा: राज्याची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक जणांना लसीकरण

अनेकवेळा टॅक्सी बिघाड, टायर पंक्चर किंवा वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास वाहन दुरुस्तीचे दुकाने सुद्धा बंद असल्याने टॅक्सी चालकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आहे. नुकतेच राज्य सरकारने रिक्षा चालकांना अर्थसहाय्य मंजूर करून दरमहा आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र टॅक्सी चालकांसाठी हा निर्णय न झाल्याने संताप व्यक्त केला जात असून, नवीन नवीन निर्बंधांमुळे टॅक्सी चालक आर्थिक अडचणीत सापडत आहे.

हेही वाचा: मुंबईत १८ वर्षापुढील लसीकरणात एक मोठं चॅलेंज

परप्रांतीय सर्व टॅक्सी चालक सध्या गावी गेले आहे. त्यातही टॅक्सी उभी कुठे ठेवायची ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यातच मुंबईत असलेल्या निवडक टॅक्सी चालकांचाही व्यवसाय फार काही चालत नाही. दोन प्रवाशांचीच परवानगी असल्याने गॅसचाही खर्च निघत नाही. त्यामुळे सरकारने टॅक्सी चालकांना आर्थिक मदत आणि वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या टॅक्सीवर कारवाई करण्यास टाळण्याची मागणी केली आहे.

ए एल क्वॉड्रोस, सरचिटणीस, टॅक्सी मेन्स युनियन

--------------

(संपादन- पूजा विचारे)

around 75 percentage taxi driver left mumbai fearing further lockdown

loading image