ठाण्यातील 'त्या' डॉक्टरांची हॉटेलातच व्यवस्था

राहुल क्षीरसागर
मंगळवार, 7 एप्रिल 2020

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल) सध्याच्या घडीला केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. येथील डॉक्‍टर व परिचारिका बाधित रुग्णांच्या सहवासात येतात. त्यामुळे घरी जाता-येता इतरांसह त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन या डॉक्‍टरांसह त्यांच्यासोबत काम करणाऱ्या परिचारिका (नर्स) यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. 

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल) सध्याच्या घडीला केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. येथील डॉक्‍टर व परिचारिका बाधित रुग्णांच्या सहवासात येतात. त्यामुळे घरी जाता-येता इतरांसह त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन या डॉक्‍टरांसह त्यांच्यासोबत काम करणाऱ्या परिचारिका (नर्स) यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. 

क्लिक करा : मुंब्रावासीयांना लॉकडाऊनचे गांभीर्यच नाही!

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना जिल्ह्यातच उपचार मिळावे यासाठी नुकताच संपूर्ण जिल्हा सामान्य रुग्णालय "कोव्हिड-19' रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. या रुग्णालयात सध्याच्या घडीला 11 बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील 25 डॉक्‍टर व परिचारिका तैनात आहेत. 

लॉकडाऊनमध्ये ठाणेकरांना दिलासा...! भाजीपाला मिळणार घरपोच

संबंधित डॉक्‍टर व परिचारिका सतत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येत असून, त्यांचा प्रवासादरम्यान इतरांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संसर्ग होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या डॉक्‍टर व परिचारिकांची एका हॉटेलमध्ये निवास आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. 

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील डॉक्‍टर व परिचारिकांना अधिक सक्षमपणे काम करता यावे, यासाठी त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. 
- एकनाथ शिंदे, 
पालकमंत्री, ठाणे जिल्हा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrangement of 'those' doctors in hotel at Thane