गळती आणि चोरी रोखण्याचे आव्हान ! गेल्या पाच वर्षात महावितरणची थकबाकी किती वाढली? वाचा

गळती आणि चोरी रोखण्याचे आव्हान ! गेल्या पाच वर्षात महावितरणची थकबाकी किती वाढली? वाचा

मुंबई, ता. 20 : महावितरण कंपनीची विजेची थकबाकी दरवर्षी कोट्यवधी रुपयांनी वाढू लागली आहे. गेल्या पाच वर्षात हीच थकबाकी तब्बल 37 हजार कोटींनी वाढली आहे. कोरोना काळात ग्राहकांनी वीज बिल न भरल्याने या थकबाकीत 8 हजार कोटींची भर पडली आहे. कंपनीची थकबाकी रोखण्यासाठी गळती आणि वीज चोरीवर नियंत्रण आणल्यास कंपनी फायद्यात येऊ शकेल, असा विश्वास वीज तज्ज्ञ प्रताप होगडे यांनी सांगितले.

मुंबई शहर आणि उपनगर वगळता राज्यातील ग्राहकांना वीज पुरवठा करणारी महावितरण ही प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी गेले काही वर्षांपासून तोड्यात असून मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. वीज ग्राहकांची थकबाकी दरवर्षी वाढत चालल्याने अधिकाऱ्यांची चिंताही वाढली आहे. महावितरण कंपनी जीवित ठेवण्यासाठी ग्राहकांनी वीज बिले थकीत ठेऊ नये, असे आवाहन कामगार संघटनेने केले आहे. 

मार्च 2014 मध्ये 14,154 कोटींवर असलेली महावितरणची सर्व प्रकारच्या ग्राहकांकडील थकबाकी मार्च 2020 ला 51 हजार 146 कोटींवर पोचली आहे. याचा 2014- 2019 या 5 वर्षांच्या काळात महावितरणची थकबाकी तब्बल 37 हजार कोटींनी वाढली आहे. दरवर्षी 7 हजार कोटींनी ही थकबाकी वाढली असून एकट्या कोरोना काळात वीज बिले भरले न गेल्याने ही थकबाकी 8 हजार कोटींनी वाढली आहे.

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्या राज्यातील 16 कोटी ग्राहकांच्या मालकीच्या आहेत. या सरकारी कंपन्या जर वीज थकबाकी आणि चालू बिल भरले नाही तर तोटयात जातील. तसेच पर्यायाने खाजगी भाडंवलदार या कंपन्याचे लचके तोडण्यासाठी आतुर आहेत. जनतेच्या मालकिचा सार्वजनिक उद्योग जिवंत रहावा म्हणून प्रत्येक वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिट विजेचे बिल भरावे, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणिस कृष्णा भोयर यांनी केले आहे. 

महावितरण कागदोपत्री तोट्यात आहे. याला कर्मचारीही तितकेच जबाबदार आहेत. वीज चोरी आणि गळती कमी करण्यासाठी कोणताही अधिकारी भर देत नाही. यामुळे महावितरण तोट्यात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. अन्यथा ही कंपनी बुडीत जाईल, असे वीज तज्ज्ञ प्रताप होगडे यांनी सांगितले.

महावितरणची वर्षनिहाय थकबाकी

मार्च 2014 -- 14,154 कोटी
मार्च 2015 -- 16,525 कोटी
मार्च 2016 --21,059 कोटी
मार्च 2017 -- 26,333 कोटी
मार्च 2018 -- 32,591 कोटी
मार्च 2019 -- 41,133 कोटी
मार्च 2020 -- 51,146 कोटी
डिसेंबर 2020 -- 71, 506 कोटी

arrears of mahavitaran have increased by 37 thousand crore in the last five years

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com