Crime News : दारुच्या नशेत मित्राची हत्या! अटकेनंतरही झिंगाट, पोलिसांना म्हणाले 20 ची द्या...

Murder
Murderesakal

डोंबिवली : ते रोज एका टेबलावर बसायचे. पण त्याच दारूच्या गुत्त्यावर चुगली करतो याचा राग आल्याने दोघांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याची घटना सोनारपाडा येथे उघडकीस आली आहे. मानपाडा पोलिसांनी अवघ्या दोन तासात या हत्येचा उलगडा करीत दारूच्या नशेत झिंग असलेल्या आरोपींना दारूच्या गुत्यावरून अटक केली आहे. दादु मदु जाधव उर्फ पाटील आणि विनोद राजाराम पडवळ अशी अटक आरोपींची नावे आहेत.

शुक्रवारी सकाळी सोनारपाडा येथील साईश्रध्दा बिल्डींगचे मागे कचऱ्यात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता त्या व्यक्तीच्या नाकातोंडाला, हात व पायावर जखमा आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक अतुल लंबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुरेश डांबरे, सुनील तारमाळे यांसह अधिकारी व अंमलदार यांची तीन पथके तयार करुन तपास करण्याच्या सूचना दिल्या.

मयत इसमाचे नांव राजेश रामवृक्ष आहे. तो डोंबिवली शहरात मिळेल त्या ठिकाणी बिगारीचे काम करीत होता व त्यास मिळेल त्या ठिकाणी तो झोपत होता. तो सोनारपाडा येथे राहणारा दादु जाधव याच्यासोबत कधी-कधी दारू पित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी साईश्रध्दा बिल्डींग मध्ये राहणारा इसम नामे दादु मह जाधव उर्फ पाटील यास ताब्यात घेतले. दादू याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने मयत राजेश याच्यासोबत दारु पित असल्याचे सांगितले. दारु विक्री करणाऱ्यास राजेश याने दादु जाधव व विनोद याचेबद्दल चुगली केली असल्याचे दादू ला समजले होते. यामुळे दादू आणि विनोद यांनी गुरुवारी रात्री राजेशला खोलीवर नेले. त्यांनी रात्रभर जेवण व दारू त्यांनी प्यायली. त्यानंतर दोघांनी राजेश याला दारुवाल्यास चुगली का करतो अशी विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.

वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोघांनी राजेशला लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. तो काही हालचाल करीत नसल्याचे पाहून तो मयत झाल्याची खात्री त्यांना झाली. त्यांनी राजेशचा मृतदेह खिडकीमधून फेकून दिला. तसेच रुममध्ये असलेले रक्ताचे डाग कपड्याने पुसून पुरावा नष्ट केला, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

Murder
Nitin Gadkari : गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी PFIशी संबंधीत; तुरुंगात ऐशोआरामासाठी १८ लाख खर्च

दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून शनिवारी त्यांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले. (Crime news)

दारूच्या गुत्यावर चुगली करतो या कारणाने आरोपींनी राजेश याची हत्या केली. दारूच्या नशेत ते एवढे झिंग होते की ते दर दोन तासांनी पोलिसांकडे साहेब 20 ची द्या अशी विचारणा करत होते.

शेजाऱ्यांकडे मागितला लाकडी दांडका

आरोपींनी राजेश यांच्यासोबत रात्रभर दारू प्यायली. पहाटे चार च्या दरम्यान त्यांच्यात वाद झाला. राजेशला मारण्यासाठी आरोपींनी चक्क शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावून लाकडी दांडका आहे का ? अशी विचारणा केली होती. पोलिसांना तपासात ही बाब उघड झाली. पोलिसांनी घराची तपासणी केली असता तेथे रक्ताचे डाग आढळून आले. यावर राजेश याची हत्या झाल्याचे उघड झाले.

Murder
Loudspeakers on Mosques: मशिदींवरील भोंग्यांवरुन हायकोर्टानं मुंबई पोलिसांना झापलं! दिले 'हे' आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com