शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या माथेफिरूला अटक

अनिश पाटील
Saturday, 12 September 2020

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केल्यानंतर तिच्यावर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणा-या माथेफिरूला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे.

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केल्यानंतर तिच्यावर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणा-या माथेफिरूला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. राज्याच्या दहशतवाद विरोधीत पथकाने(एटीएस) ही कारवाई केली.  शिवसेना नेते संजय राऊत यांना तर एका माथेफिरूने सोशल मिडियावर खुल्ली जीवे मारण्याची धमकी दिली होती.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेपासून ते सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वेळोवेळी शिवसेना नेते संजय राऊत भाजपला अंगावर घेत होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगनाने उडी घेतल्यानंतर राऊतांनी तिला चांगलेच फटकारले. दोघांमध्ये चांगलाच शाब्दीक वाद झाला. कंगनाने मुंबई मला पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटत असल्याचे विधान केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. या वादा दरम्यान कंगनाच्या एका चाहत्याने इंटरनेट कॉलद्वारे  शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी दिली.

हेही वाचाः  कोरोनाशी लढण्याऐवजी कंगनाशी लढण्यात सरकार मश्गूल, भाजपची टीका

या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संबधित व्यक्तीचा माग काढला. त्यावेळी तो कोलकत्ता येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने त्याला अटक केली आहे.  त्याला कोलकत्तामधील न्यायालयात हजर करून  ट्रान्झिस रिमांडद्वारे मुंबईत आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पलश घोष असे आरोपीचे नाव असून तो  व्यायाम शाळेत प्रशिक्षक म्हणून काम करतो. आरोपीने स्वतःला दाऊद टोळीचा हस्तक असल्याचे सांगितले होते.

-----------

(संपादनः पूजा विचारे) 

arrested for threatening Shiv Sena leader Sanjay Raut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrested for threatening Shiv Sena leader Sanjay Raut