भिवंडीत इराणच्या कांद्याची आवक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनसह अन्य देशांतून येणाऱ्या संशयास्पद वस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे; मात्र असे असतानाच इराण येथून भिवंडीत विक्रीसाठी आलेला कांदा एका बंद यंत्रमाग कारखान्यात साठवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भिवंडी : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनसह अन्य देशांतून येणाऱ्या संशयास्पद वस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे; मात्र असे असतानाच इराण येथून भिवंडीत विक्रीसाठी आलेला कांदा एका बंद यंत्रमाग कारखान्यात साठवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खोणी ग्रामपंचायत हद्दीतील मीठपाडा येथे हा कांदा साठवण्यात आला आहे. 

ही बातमी वाचली का? धक्कादायक! नवी मुंबईत बलात्काराचा दोन घटना उघड...

भिवंडीत विक्रीसाठी आलेल्या या कांद्याचा आकार मोठा असून, त्याला आता कोंबदेखील फुटले आहेत. सडक्‍या वासामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून चौकशी सुरू केली आहे. भिवंडी तालुक्‍यातील वळ व पूर्णा ग्रामपंचायत परिसरात विदेशातून आणलेले जुने मास्क धुऊन पुन्हा विक्री करण्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी उघड झाला. असे असतानाच आता इराण येथून भिवंडीत विक्रीसाठी आलेला कांदा एका बंद यंत्रमाग कारखान्यात साठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार खोणी ग्रामपंचायत हद्दीतील मिठपाडा येथे उघडकीस आला.

ही बातमी वाचली का? आम आदमी पक्षाकडून‘ही’घोषणा; उतरणार मैदानात...
 
मिठपाडा येथील बंद कारखान्यात मागील आठ दिवसांपासून हा कांदा साठवून ठेवण्यात आला आहे. त्यास दुर्गंधी सुटल्यानंतर परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास जाणवला. त्यामुळे आकाश साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता हा कांदा इराण येथून आला असल्याची माहिती त्यांना या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली. 

हा कांदा परेश मेहता या व्यापाऱ्याचा असून, त्याने मिठपाडा येथील पवन शेठ या कारखाना मालकाच्या कारखान्यात सध्या हा कांदा साठवून ठेवला आहे. हा कांदा जवळपास 60 टन इतका आहे. 
- रियाज अली, कारखाना व्यवस्थाक. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arrival of Iranian onion in bhiwandi thane

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: