आम आदमी पक्षाकडून‘ही’घोषणा; उतरणार मैदानात...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी कल्याणमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी कल्याणमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रभागनिहाय अध्यक्ष निवडीसह जनतेच्या समस्यांवर आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

ही बातमी वाचली का? मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला! वाचा भेटीमागील कारण...

दिल्लीत आम आदमी पक्षाला भरघोस यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रात सर्व महानगरपालिका निवडणुका आम आदमी पार्टी लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्या धर्तीवर रविवारी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सह सचिव रुबेन मस्करहन आणि ठाणे पालघरचे अध्यक्ष विजय पंजवानी यांनी कल्याणमध्ये दौरा करत स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. 

ही बातमी वाचली का? YES बँक ग्राहकांनो, आता सर्वात आधी हे करा... 

रविवारी जागतिक महिला दिनानिमित्त अनेक महिलांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. निवडणूक लढण्यापूर्वी प्रत्येक प्रभागनिहाय अध्यक्ष नियुक्ती करणे आणि जनतेच्या समस्यांवर काम करणे, आंदोलन करणे आदी विषयांवर चर्चा केली. या वेळी आम आदमी पार्टीचे स्थानिक पदाधिकारी ॲड. धनंजय जोगदंड, रवी केदारे, दीपक दुबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aam Aadami party Kalyan-Dombivali Municipality to contest