esakal | राणीच्या बागेतील वनराजाचे आगमन लांबले

बोलून बातमी शोधा

File Photo

निविदा काढणे तूर्तास अशक्‍य

राणीच्या बागेतील वनराजाचे आगमन लांबले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील वनराजाचे आगमन कोरोनामुळे लांबणीवर पडले आहे. कोरोनाचे संकट दूर होताच मुंबईला पट्टेदारी वाघ पाहाता येणार आहे. तब्बल सात वर्षांनी राणीच्या बागेत सिंह दाखल होणार आहेत.

साधी पाण्याची वाफ घ्या, पण अति करू नका, कारण...

मुंबईत गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून सिंहाची जोडी आणण्यात येणार होती. त्यासाठी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला झेब्राच्या दोन जोड्या द्यायच्या होत्या. या झेब्रा जोडीच्या खरेदीसाठी महापालिका निविदा मागवणार होती. मात्र, आता कोरोनामुळे जागतिक पातळीवरील सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. त्यामुळे या निविदा काढणे तूर्तास शक्‍य नसल्याचे प्राणिसंग्रहालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

धक्कादायक! अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा धोक्यात

औरंगाबाद येथून राणीच्या बागेत महिनाभरापूर्वी वाघाची जोडी दाखल झाली होती. ही जोडी आता मुंबईच्या वातावरणात चांगली रुळली आहे. सध्या ही जोडी नव्या प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पिंजऱ्यात देखरेखीखाली आहे. मात्र, ते मुख्य पिंजऱ्यात हलवण्यासाठी तयार आहे. त्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

...म्हणून लॉकडाऊन काळात हैराण झालेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख

दाणापाणी मुबलक
पालिकेने प्राणिसंग्रहालय १५ मार्चपासून बंद केले आहे. मात्र प्राण्यांसाठी दाणापाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. हरण तसेच इतर शाकाहारी प्राण्यांना गवत, तसेच इतर आहार द्यावा लागतो. तर वाघ, बिबट्याला मांस द्यावे लागते. माकड तसेच इतर पक्ष्यांना फळे आणि दाणे द्यावे लागतात. हा सर्व आहार मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. तसेच प्राण्यांचा आहार अत्यावश्‍यक सेवेत असल्याने पुरवठ्यातही अडचणी होत नसल्याचे सांगण्यात आले.

The arrival of the Lion delay in the Jijamata garden