Mumbai News : एआय माणसाला कधीही पर्याय होऊ शकणार नाही; डॉ. आर चिदंबरम् यांचे प्रतिपादन

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) ने जगभरातील विविध क्षेत्रात मोठे आव्हान निर्माण केलेले आहेत.
dr r chidambaram
dr r chidambaramsakal

मुंबई - कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) ने जगभरातील विविध क्षेत्रात मोठे आव्हान निर्माण केलेले आहेत. मात्र हे एआय माणसाला पर्याय म्हणून कधीही होऊ शकणार नाहीत, त्याला भावना नाहीत, असे प्रतिपादन पद्मविभूषण व ज्येष्ठ संशोधक डॉ. आर. चिदंबरम् यांनी आज मुंबईत केले.

ज्येष्ठ संशोधक प्रो. बी. सी. हलदार जन्म शताब्धी महोत्सवानिमित्त डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विज्ञान संस्था, तसेच विज्ञान संस्था ट्रस्टीजने 'शाश्वत विकासासाठी रसायनशास्त्रातील योगदान' या विषयावर परिषदचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी प्रो. बी.सी. हलदार यांच्या जन्मशताब्धी वर्षानिमित्त एका विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी आयसीटीचे माजी संचालक पद्म विभूषण व दुसरे प्रमुख पाहुणे प्रो. एम. एम.शर्मा, पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, विज्ञान संस्था सुवर्ण महोत्सव विश्वस्त निधीचे प्रमुख व परिषदेचे समन्वयक डॉ. ए. डी. सावंत, विज्ञान संस्थेचे संचालक प्रो. एस.बी. कुलकर्णी, प्रो. युवराज मलगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेला रसायनशास्त्रासह विविध क्षेत्रातील संशोधक, विद्यार्थी आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात हलदार यांच्या कन्या प्रो. बी.सी. हलदार यांच्या जीवन प्रवासाची आणि रसायनशास्त्र आणि न्यूक्लीअर आदी क्षेत्रातील केलेलया संशोधनाची माहिती दिली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी कुलगुरू डॉ.ए.डी. सावंत यांनी केले.

यावेळी डॉ. आर. चिदंबरम पुढे म्हणाले, एआयला कोणत्याही भावना नाहीत. ते आपल्याशिवाय विचारही करू शकत नाही. त्यामुळे आज जगभरात त्यामुळे आव्हाने निर्माण झाली असली तरी तो माणसाला कधीही पर्याय होऊ शकणार नाही. यामुळे त्याबद्दल सध्या व्यक्त केली जाणारी भीती अनाठायी असल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांची राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय विकासाच्या संदर्भात माहिती दिली.

आयसीटीचे माजी संचालक पद्म विभूषण प्रो. एम. एम. शर्मा, यांनी जगभरात नव्याने येऊ घातलेल्या लिग्नो केमेस्ट्रीच्या नव्या शाखेबाबत माहिती देत यावरील संशोधन हे रसायनशास्त्रातील एक नवी पहाट असल्याचे सांगितले. नवीन ऊर्जा वापरासाठी सोलार, बिंड, इलेक्ट्रोल, हायड्रोजन फ्युअर आदींचे निर्माण आणि त्याचे महत्व विशद केले.

तसेच वाढत्या कार्बनचा उपयोग करून विविध प्रकारची रसायने कशी तयार करता येतील, यावरही त्यांनी भर डॉ. जी. डी. यादव यांनी कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावीर पर्याय सांगत उर्जेचे नवे स्त्रोत, आदीची माहिती दिली. नॉर्थ इंडिया मध्ये ३५० मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन केवळ कृषी कचरा जाळल्याने होतो. त्यामुळे या शेतातील जळणाच्या वस्तू न जाळता त्यातून काही रसायने निर्माण करता येऊ शकतील यावर भर दिला.

ब्लू आणि ग्रीन हायड्रोजनचा वापर जगभरात सुरू झाला असून देशातही त्यासाठी पाऊल टाकले गेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच २०५० पर्यंत जगात क्रूड ऑईल उपलब्ध नसेल त्यामुळे नव्या पर्यायांमध्ये हायड्रोजन ऊर्जा हा सर्वात चांगला पर्याय असेल. प्लास्टिक बंदी हा काही पर्याय नाही. त्याचा पुनर्रवापर आपण कसे करू यावरून त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बौद्धीक संपदा (पेटंट)या विषयावर व्हीजन आयपीआरचे सीईओ प्रो. प्रबुद्ध गांगुली यांनी प्रकाश टाकत यासाठीचे महत्व विशद केले. यानंतर डॉ. व्ही. आय लक्ष्मण, प्रो. विमल जैन, प्रो. गायत्री बाराब्दे, प्रो. रघुनाथ आचार्य आदींनी रसायनशास्त्र, न्यूक्लिआर आदी विषयांवर आपले विचार मांडले तर काहींनी डॉ. हलदार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com