अरुण गवळींना दिसली रेल्वे ट्रॅकवर बॉडी आणि त्यांनी ट्रेन तत्काळ थांबवली..

अरुण गवळींना दिसली रेल्वे ट्रॅकवर बॉडी आणि त्यांनी ट्रेन तत्काळ थांबवली..

मुंबई : मुंबईत ट्रेनचे अपघात होणं काही नवीन राहिलेलं नाही. अनेकदा पोलिसांकडून, रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगून, अनेकदा ट्रेनमध्ये घोषणा करूनही अनेकजण मुद्दामून भारी वाटतं म्हणून रेल्वेच्या दरवाजात उभे राहतात, हात बाहेर काढतात किंवा स्टंट करतात. मुंबईत पुन्हा अशीच एक घटना घडल्याचा संशय आहे. मुंबईत एका ट्रेनच्या मोटरमनला एका व्यक्तीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर दिसला. रेल्वे ट्रॅकवरील हा इसम कोण? म्हणून (अरुण गवळी) ट्रेनचे मोटरमन यांनी गाडी थांबवली. सदर इसमाची बॉडी रेल्वे पोलिसांच्या मदतीने कळवा स्थानकापर्यंत पोहोचवली. यानंतर ही बॉडी ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आली. 

पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर हा मृतदेह युसुफ खान नावाच्या 25 वर्षीय तरुणाचा असल्याची बाब समोर आली. यानंतर त्याच्या घरच्यांना घटनेबद्दल माहिती देण्यात आली. 

(GRP) गव्हर्मेंट रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार या तरुणाच्या खिशामध्ये आयडी कार्ड आणि रेल्वेचं तिकीट मिळालंय. यावरून त्यांच्या घरच्यांना संपर्क साधण्यात आलाय. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे हा इसम ट्रेनच्या दरवाजात लटकत असताना पडला असल्याची शंका व्यक्त केली जातेय. 

युसुफ खानच्या भावाच्या माहितीनुसार, युसुफ त्याच्या भावाकडे सांताक्रुझला जात होता. ट्रेनमध्ये लटकत असताना इलेक्ट्रिक पोलवर आदळून युसुफ खाली पडला असू शकतो असं म्हटलंय. युसूफच्या बॉडीजवळच एक इलेक्ट्रिक पोल देखील आहाळून आलाय. दरम्यान या पोलवर आदळून पडल्याने युसुफचा जागीच मृत्यू झाला असु शकतो, असं देखील गव्हर्मेंट रेल्वे पोलिसांनी सांगितलंय. 

सदर घटना कालची आहे. काल रविवार होता. कालच्या रविवारी मेगाब्लॉक नव्हता. त्यामुळे ट्रेनला गर्दी तशी फार कमी असते. या आधीदेखील 30 वर्षीय महिला मुंब्रा कळवा दरम्यान ट्रेनमधून पडून मृत्युमुखी पडली होती. 

WebTitle : arun gawali saw dead body on railway track inbetween kalwa and mumbra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com