केजरीवाल, भगवंत मान घेणार उद्धव ठाकरेंची भेट; काय आहे कारण जाणून घ्या : Kejriwal with Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Kejriwal with Thackeray: केजरीवाल, भगवंत मान घेणार उद्धव ठाकरेंची भेट; काय आहे कारण जाणून घ्या

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही राजकीय भेट असल्याची चर्चा आहे. मार्च महिन्यात उद्धव ठाकरे यांनी मुंबईत विरोधीपक्षांची सभा घेण्याच्या तयारीत आहेत. यापार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. (Arvind Kejriwal and Bhagwant Mann will meets Uddhav Thackeray today at Mumbai)

निवडणूक आयोगानं शिवसेनेची सूत्र अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडं सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग तसेच केंद्रातील भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत घोषणा केली होती की, "मार्च महिन्यात देशभरातील विरोधीपक्षांची सभा आयोजित करण्यात येणार आहे. याचं नेतृत्व स्वतः उद्धव ठाकरे करणार आहेत"

केजरीवाल आणि मान हे दोघेही एक दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरेंच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे दोन्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ते भेट घेतील.

या बैठकीत २०२४ मध्ये मोदींना कसं रोखायचं याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर काँग्रेसला सोबत घेऊन पुढची लोकसभा लढवायची असाही मुद्दा यावेळी चर्चेत येऊ शकतो, असंही सांगण्यात येत आहे.