राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं : Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar

Sharad Pawar News: राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्दावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यावरुन जर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाला अनुसरुन राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Will there be mid term elections in Maharashtra Sharad Pawar said clearly)

पत्रकारांनी पवारांना विचारलं की, उद्धव ठाकरे यांनी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी काल ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार अपात्र ठरल्यास राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असा दावा केला होता. यावर पवार म्हणाले, त्यांनी कशाच्या आधारावर हे भाष्य केलंय मला माहिती नाही, पण सध्याची परिस्थिती पाहता मला असं वाटत नाही.

दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मतदारांना ऑनलाईन आवाहन केलं. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि हुकूमशाहीला रोखा, असं ते म्हणाले.

"दिवस पुढे सरकत चाललेत त्यामुळं म्हणता म्हणता माझा तर अंदाज आहे की, राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागू शकतात. कारण आमदारांच्या अपात्रतेचा जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळं ते जर का उडाले तर मध्यावधी निवडणुका लागू शकतात," असंही ठाकरे म्हणाले होते.