'आर्यननेच मला शाहरुख-गौरीला फोन करायला सांगितलं'; गोसावीचा खुलासा

'एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांना मी ओळखत नव्हतो'
KP Gosavi
KP GosaviSakal

मुंबई: "शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खाननेच (Aryan khan) मला त्याच्या आई-वडीलांना फोन लावायला सांगितला" असा दावा के.पी.गोसावी (k.p.gosavi) यांने केला आहे. फरार असलेला के.पी.गोसावी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (drugs case) स्वतंत्र पंच आहे. एनसीबीने कॉर्डीलिया क्रूझवर छापा मारल्यानंतर के.पी.गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी काढला होता. या सेल्फीमुळेच के.पी.गोसावी गोत्यात आला.

"आर्यन खाननेच मला त्याच्या मॅनेजरला फोन लावायला सांगितला. कारण त्याच्याकडे स्वत:चा फोन नव्हता. माझ्याकडे फोन होता. त्याने मला त्याच्या आई-वडिलांना आणि मॅनेजरला फोन लावून देण्याची विनंती केली" असे गोसावीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.

KP Gosavi
ट्रिपल तलाक: निकाह हलाला प्रथेच्या नावाखाली महिलेवर सामूहिक बलात्कार

"६ ऑक्टोबरपर्यंत मी मुंबईतच होतो. मला अनेक धमकीचे फोन आले. त्यामुळे मला माझा फोन बंद करावा लागला. एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्याबद्दल मला आधी माहित नव्हतं. त्यांना मी टीव्हीवरच बघितलं" असं गोसावीने सांगितलं.

KP Gosavi
Realme 9 व Realme 9 Pro लवकरच लॉंच होणार! जाणून घ्या किमती

"मी याआधीच्या एनसीबीच्या कुठल्याही कारवाईचा भाग नव्हतो" असे गोसावी म्हणाला. "मी मजकूर वाचल्यानंतरच स्वाक्षरी केली" असे गोसावीने सांगितले. या प्रकरणातील आणखी एक पंच प्रभाकर साईल यांनी उलटा आरोप केला आहे. एनसीबीने आपल्याला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला लावली, असे सांगितले. त्यानंतर गोसावीने हा खुलासा केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com