Realme 9 व Realme 9 Pro लवकरच लॉंच होणार! जाणून घ्या किमती

Realme 9 व Realme 9 Pro लवकरच लॉंच होणार! जाणून घ्या किमती
Realme 9 व Realme 9 Pro
Realme 9 व Realme 9 ProSaka
Summary

Realme 9 स्मार्टफोन सिरीजच्या लॉंचिंगबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Realme 9 स्मार्टफोन सिरीजच्या लॉंचिंगबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आगामी सिरीजमधील एक डिव्हाइस IMEI डेटाबेसवर दिसून आला आहे, जो Realme 9 Pro Plus असल्याचे मानले जाते. याशिवाय Realme 9 सिरीज अंतर्गत Realme 9 आणि Realme 9 Pro देखील जागतिक बाजारात लॉंच केले जाऊ शकतात. तथापि, कंपनीने आगामी Realme 9 सिरीजबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Realme 9 व Realme 9 Pro
इंटरनेट स्पीडमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत भारत कुठे आहे?

टेक टिप्स्टर मुकुल शर्मा यांच्या मते, मॉडेल क्रमांक RMX3393 सह आगामी Realme 9 Pro Plus स्मार्टफोन IMEI डेटाबेसवर लिस्ट आहे. परंतु डिव्हाइसच्या स्पेसिफिकेशन किंवा किमतीबाबत सूचीमधून कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. लॉंचबद्दल सांगितले जात आहे की, हा आगामी स्मार्टफोन लवकरच लॉंच केला जाऊ शकतो. दुसरीकडे, अनेक रिपोर्टसमध्ये दावा करण्यात आला आहे की, Realme 9 सिरीजचे सर्व हॅंडसेट पुढील वर्षी जागतिक बाजारात दाखल होतील.

Realme 9 Pro ची अपेक्षित वैशिष्ट्ये

लीक झालेल्या रिपोर्टसनुसार, Realme 9 Pro स्मार्टफोनमध्ये OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यासोबतच यूजर्सना स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट, 108 MP कॅमेरा आणि मजबूत बॅटरीचा सपोर्ट मिळू शकतो. तसेच यात पंच-होल कॅमेरा मिळू शकतो.

Realme 9 Pro ची अपेक्षित किंमत

Realme 9 Pro स्मार्टफोनच्या किमतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही; पण लीक झालेल्या माहितीनुसार, Realme 9 Pro ची किंमत 25,000 ते 30,000 च्या दरम्यान असू शकते.

Realme 9 व Realme 9 Pro
स्टोअरेज फुल्ल झाल्याने फोन स्लो झालाय! या ट्रिक्‍सने सुटेल समस्या

कंपनीने Realme 8 या वर्षी मार्चमध्ये जागतिक बाजारात लॉंच केले. या फोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये आहे. फीचरबद्दल बोलायचे झाले तर, Realme 8 स्मार्टफोनमध्ये यूजर्सना 6.4 इंचाचा डिस्प्ले आणि मीडियाटेक हेलियो जी 95 प्रोसेसर मिळेल. या डिव्हाइसमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी आहे, जी "30W डार्ट चार्ज' या फास्ट चार्जरने चार्ज केली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com