मोठी बातमी! आर्यन खानला क्लिनचिट;NCB ने आरोपपत्रातून नाव वगळलं

आर्यनविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने ही क्लिनचिट दिल्याचं NCB ने सांगितलं आहे.
Aryan Khan
Aryan KhanSakal Digital

Aryan Khan Cruise Drugs case

कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात आर्यन खानला क्लिनचिट देण्यात आली आहे. एनसीबीने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानचं नाव घेतलेलं नाहीये. आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ आढळले नाहीत. त्यामुळे एनसीबीकडूनच त्याला क्लिनचिट देण्यात आलेली आहे. (Aryan Khan go clean chit from NCB in Mumbai Cruise Drugs Party Case)

आर्यन खानच्या (Aryan Khan) प्रकरणात एक मोठा खुलासा एनसीबीकडून करण्यात आला आहे. आर्यन खान आणि त्याच्यासोबतच्या सहा आरोपींचं नाव आरोपपत्रातून वगळण्यात आलेलं आहे. कारण त्यांच्याकडे ड्रग्ज असल्याचे कोणतेही सबळ पुरावे आढळून आलेले नाहीत. या सहा जणांकडे कोणताही अमली पदार्थ सापडला नाही, पण त्यांच्यासोबतच्या मित्रांकडे हे पदार्थ सापडले होते, तेवढ्यावरून या लोकांना अटक करण्यात आली होती.

पण जेव्हा हा तपास एसआयटी (SIT Committee of NCB) कमिटीकडे गेला, त्यावेळी या सहा जणांकडे कोणतेही अमली पदार्थ आढळले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार केली जाणार नाही, किंवा त्यांच्यावर करण्यात येणार नाही, असं सांगत एनसीबीने (Narcotics Control Bureau) त्यांना क्लिनचिट दिली आहे. मात्र उर्वरित १४ जणांवर आज पहिलं आरोपपत्र दाखल कऱण्यात आलं आहे.

क्लिनचिट मिळालेले सहा जण कोण?

आर्यन खान, अविन साहू, गोपाळ आनंद, समीर सिघन आणि भास्कर अरोडा, मानव सिंघल. या सहा जणांकडे कोणताही अमली पदार्थ सापडला नाही. केवळ त्यांच्यासोबत असलेल्या, त्यांच्या मित्रांकडे अमली पदार्थ सापडले आहेत.

मुंबईतल्या कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या पार्टीमध्ये ड्रगचं सेवन आणि खरेदी विक्री केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकांना ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही आठवड्यांनी अखेर आर्यन खानची जामिनावर मुक्तता झाली होती. मुंबई सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. या प्रकरणातलं पहिलं आरोपपत्र आता दाखल करण्यात येत असून त्यातून आर्यन खान आणि इतर सहा जणांची नावं वगळण्यात आली आहेत. मात्र १४ जणांवर कारवाई करण्यात येणार असून त्यांची नावं या आरोपपत्रात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com