आर्यन खानच्या जामीनासाठी वकिलांचा उच्च न्यायालयात अर्ज

aryan khan
aryan khanesakal

सत्र न्यायालयात जामीन याचिका फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. क्रूझ शिप केस प्रकरणात आर्यन खानला सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वकिलांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठोवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय.

सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. उद्या सकाळी न्यायालयाकडून तातडीच्या प्रकरणांची सुनावणी कधी होणार, यावर स्पष्टीकरण येऊ शकतं. कारण न्यायालयाला दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्याआधी महत्वाच्या प्रकरणांची पुढील तारीख ठरवली जाते. त्यामुळे तातडीच्या प्रकरणांमध्ये आर्यन खानचा खटला घ्यावा, यासाठी वकील प्रयत्नशील आहेत.

3 ऑक्टोबरला गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर आर्यन खानला त्याच्या मित्रांसोबत पकडण्यात आलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकलेल्या छाप्यामध्ये आर्यनच्या मित्रांकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले. आर्यन देखील या अमली पदार्थाचं सेवन करणार असल्याची माहिती एनसीबीने कोर्टात दिली. यानंतर 14 तारखेपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ही तारीख 20 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र आज पार पडलेल्या सुनावणीत आर्यनची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या आर्यन आर्थर रोड तुरुंगात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com