

heatwave update
ESakal
ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात उकाडा वाढला असून पारा ३७ अंशाच्या पुढे सरकत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि सायंकाळपासून पहाटेपर्यंत बोचणारा उकाडा असा अनुभव ठाणेकरांना येत आहे. साधारण होळी पेटल्यानंतर ऋतू परिवर्तनाला सुरुवात होते. मात्र हे चक्र आधीच फिरल्यामुळे त्याचा फटका आरोग्यावर होऊ लागला आहे. वाढते प्रदूषण आणि चढत्या पाऱ्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार बळावू लागले आहेत.