esakal | Ashadhi Ekadashi: विरारच्या कौशिकने साकारला अनोखा पांडुरंग
sakal

बोलून बातमी शोधा

Vitthal-Art-by-Kaushik-Jadhav

Ashadhi Ekadashi: विरारच्या कौशिकने साकारला अनोखा पांडुरंग

sakal_logo
By
संदीप पंडित

'जिथे तिथे रूप तुझे दिसू लागले' या उक्तीचा कौशिकने करून दिला प्रत्यय

विरार: 'जिथे तिथे रूप तुझे दिसू लागले' असं देवाच्या बाबतीत नेहमी म्हणतात. याचाच प्रत्यय आषाढी एकादशीच्या निमित्ताने वसई तालुक्यातील भाताणे परिसरात आला. विरारच्या कौशिक दिलीप जाधव या तरुणाने पाने, फुलं, स्क्रू ड्रायव्हरपासून ते अनेक तांत्रिक वस्तूंच्या सहाय्याने चक्क विविधरूपी विठ्ठल साकारला. पांडुरंगाचे रूप साकारून त्याने घरबसल्याच अनोखी वारी केली. (Ashadhi Ekadashi 2021Vitthal Art by Virar Boy Kaushik Jadhav he made Pandurang of Tree Leaves Flowers Pencils Screw Driver Scissors vjb 91)

महाराष्ट्राची आराध्य अस्मिता अर्थात पांडुरंग टाळ-मृदुंगाच्या तालात पंढरीच्या दिशेने पावले चालायला लागली की वारीची ओढ लागते. प्रपंच मागे सोडून बा विठ्ठलाचे सगुण साजीरे रूप डोळाभर साठवण्यासाठी भक्तांचा मळा पंढरीच्या वाळवंटात फुलतो. सगळ्यांनाच वारी करता येत नाही. मात्र तरीही त्या पांडुरंगाप्रती प्रत्येकाची ओढ असतेच.

एकतरी वारी अनुभवावी ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच. मात्र वारी न करताही आपल्याच कामातून विठ्ठलाला रोज भेटणारे संत सावता माळी संत साहित्यातून पदोपदी भेटतात. याच सावता माळ्यांप्रमाणेच विठ्ठलाला आपल्या घराच्या चार भिंतीत पाहणारे, त्याच्याप्रती श्रद्धाभाव ठेऊन वारी परंपरेचे पाईक होणारे श्रद्धाळू तरूण आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पाहायला मिळतात.

असाच एक तरुण विरार पूर्वेतील भाताणे येथे असून कौशिक दिलीप जाधव हा याच तरूणांपैकी एक. त्याने कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी म्हणत घरातील तांत्रिक वस्तूंचा प्रभावी वापर करून त्यांच्या जोडणीतून विठोबाची प्रतिमा साकारली आहे. कौशिक हा तानसा ग्लोबल स्कूल सीबीएससी याठिकाणी कार्यरत आहे. मी माझ्या कामातच पांडुरंगाची अनुभूती घेतो. असे त्याने सकाळशी बोलताना सांगितले.कौशिक याच्या या प्रयत्नांबद्दल वसई न्यू इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक अभिमान पाटील व प्रो. अभिजित ऐवळे यांनी त्याचे कौतुक केले. घरच्या घरी तांत्रिक उपकरणांतून पांडुरगाला साकारून अनोखी वारी करणारा कौशिक सध्या तरूणांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.

loading image