
मुंबई : मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यामध्ये काही दुमत नाही. पण त्यापूर्वी लोककलेमधून नाट्यकलाकृतीचे काही संदर्भ सापडत असून, त्याबद्दल लेखन आणि चर्चा सुरू आहे. याबाबत सखोल अभ्यास आणि संशोधन होण्याची गरज आहे. त्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी रविवारी केले.