गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत म्हणत आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड कनेक्शनबाबत आशिष शेलार म्हणतात...

सुमित बागुल
Monday, 14 September 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. यामध्ये शिवसेनेचे नेते, राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवलं जातंय. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी स्वतः याबाबत एक पत्रक काढत आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा स्पष्ट खुलासा केला होता. 

मात्र तरीही विरोधी पक्षाकडून सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होताना पाहायला मिळतायत. आजही भाजप नेते आणि प्रवक्ते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. "बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात", असं म्हणत भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

महत्त्वाची बातमी कंगना गेली 'मनाली'ला आणि शिवसेनेकडून कंगनाबद्दल आली 'मोठी' प्रतिक्रिया

एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आशिष शेलार बोलत होते. यावेळी बोलताना शेलार म्हणालेतर की, वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नाही, तिथे प्रामाणिक मतदार राहतात. या मतदारसंघात बॉलिवूडमधीलही अनेक लोकं राहतात. मी कधीही बॉलिवूडच्या पार्ट्याना जातो असं पत्रक काढत नाही. बॉलिवूडशी संबंध आहे असं पत्रक काढणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत आशिष शेलार म्हणालेत. यापुढे बोलताना आशिष शेलार यांनी सध्या गुंडांच्या हातात सत्ता असल्याचंही म्हटलंय. 

नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्लावारही आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुंड प्रवृत्तीची लोकं सध्या सत्तेत आहेत असं म्हणत आशिष शेलार यांनी कांदिवलीमध्ये एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या मारहाणीवर आपलं मत मांडलं. निवृत्त नौदल अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंचं एक व्यंगचित्र Whats App च्या माध्यमातून फॉरवर्ड केलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती. 

ashish shelar on current government indirect poking to aditya thackeray bollywood connection


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashish shelar on current government indirect poking to aditya thackeray bollywood connection