esakal | कंगना गेली 'मनाली'ला आणि शिवसेनेकडून कंगनाबद्दल आली 'मोठी' प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

कंगना गेली 'मनाली'ला आणि शिवसेनेकडून कंगनाबद्दल आली 'मोठी' प्रतिक्रिया

"कंगनाला मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने स्वतःचा बोरा बिस्तर गुंडाळावा." - अनिल परब 

कंगना गेली 'मनाली'ला आणि शिवसेनेकडून कंगनाबद्दल आली 'मोठी' प्रतिक्रिया

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : गेले अनेक दिवस मुंबई आणि महाराष्ट्राचं राजकारण तापलंय ते कंगना आणि शिवसेनेच्या सामन्यामुळे. कंगनाची ट्विटरवरील टिप्पण्या, कंगनाचं मुंबईत येणं, तिच्या ऑफिसचा अनधिकृत भाग तोडला जाणे, त्यानंतर कंगनाकडून मुख्यमंत्र्यांच्या एकेरी भाषेत उल्लेख होणं, कंगना राज्यपालांच्या भेटीला जाणं आणि मुंबईतून आज मनालीला परतताना पुन्हा एकदा मुंबईचा उल्लेख POK असा करणं. यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कंगनाला कठोर शब्दात सुनावलं आहे. 

महत्त्वाची बातमी - मुंबईकरांनो! मोकळा श्वास घ्या, मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम

याबाबत बोलताना अनिल परब म्हणालेत की, कंगनाला मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने स्वतःचा बोरा बिस्तर गुंडाळावा. मुंबईबाबत वाईट भाषा आम्ही ऐकून घेणार नाही. त्यामुळे कंगनाने मुंबईतून आपला बोरा बिस्तारा उचलावा, असं रोखठोक मत अनिल परब यांनी व्यक्त केलंय. कंगनाने नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. यावर देखील परब म्हणालेत की, मुंबईत दररोज अनेक अनधिकृत बांधकामे पडली जातात. राज्यपालांनी मुंबईतील ज्या गंरीबांची अनधिकृत बांधकामं तोडली जातात त्या सर्वांना भेटावं, एकटी कंगनाच का ? राज्यपाल जर अनधिकृत बांधकामे करणार्यांना भेटत असतील तर त्यांनी अनधिकृत बांधकामे हटवलेल्या सर्व सर्वसामान्यांना भेटायला हवं, असा टोलाही अनिल परब यांनी लगावलाय. 

महत्त्वाची बातमी - मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

माजी नौदल अधिकार्याबाबत शिवसैनिकांनी उचललेल्या पावलावर देखील अनिल परब यांनी आपलं मत मांडलं. एक शिवसैनिक म्हणून मातोश्री आमचं देऊळ आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांना, आमच्या दैवताला कुणी काही बोलत असेल तर त्यावर शिवसैनिकांनी दिलेली ती उत्स्फ़ुर्त प्रतिक्रिया होती. सर्वांनी आपली मर्यादा राखावी. केवळ सत्तेत आहोत म्हणून आमच्या दैवताला कुणी काहीही बोललं म्हणून आम्ही काही बोलायचं नाही का ? असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय. नौदल अधिकार्याबाबत जे घडलं ती शिवसैनिकांची उत्स्फर्त प्रतिक्रिया होती असं परब म्हणालेत. 

shivsena party spokesperson anil parab on kangana ranaut and her comment of POK

loading image