esakal | भातखळकरांकडे मुंबईची जबाबदारी देऊन भाजपने आशिष शेलारांचे पंख छाटले ?
sakal

बोलून बातमी शोधा

भातखळकरांकडे मुंबईची जबाबदारी देऊन भाजपने आशिष शेलारांचे पंख छाटले ?

पायरी पासून कळसापर्यंत मुंबई आणि मुंबई महानगर पालिकेची खडानखडा माहिती असलेले भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी महापालिके पासून दुर ठेवण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे.

भातखळकरांकडे मुंबईची जबाबदारी देऊन भाजपने आशिष शेलारांचे पंख छाटले ?

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई, ता.19: पायरी पासून कळसापर्यंत मुंबई आणि मुंबई महानगर पालिकेची खडानखडा माहिती असलेले भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी महापालिके पासून दुर ठेवण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. मुंबई महानगर पालिकेचे प्रभारी म्हणून आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर आगामी महानगर पालिका निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : रात्रीची शांततेची वेळ पाहून टोळी साधते आपला डाव, लोकहो सावधान 'बच्चा चोर गॅंग' झालीये सक्रिय

शेलार हे दोन वेळा नगरसेवक होते. या काळात त्यांनी पक्षाचे गटनेते तसेच सुधार समिती अध्यक्ष पदही भुषवले होते. मुंबई पालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांची संख्या 29 वरुन 82 वर पोहचली आहे. त्यानंतर त्यांना 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना मंत्रीपद देण्यात आले होते. या मंत्रीपदासाठी ते भाजपची सत्ता आल्या पासून ते वेटींगवर होते. फडणवीस आणि शेलार यांच्या फारसे सौख्य नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.

अभ्यासू नगरसेक तसेच अभ्यासू आमदार म्हणून शेलार यांची ओळख आहे. पालिकेत प्रशासनाला कात्रीत पडकण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रशासकीय कामाकाजाची जाण तसेच मुंबईच्या प्रत्येक गल्लीतील समस्याही ते ओळखून आहेत. त्याचबरोबर शिवसेनेशी थेट भिडण्यातही ते पुढे असतात. असे असतानाही त्यांना मुंबई पालिकेची जबाबदारी न दिल्या बद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्त्वाची बातमी चायनीज हॉटेल्सचा चीनशी काय संबंध ? बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार?", संजय निरुपम यांनी उडवली सेनेची खिल्ली

शेलार मुंबईतून 'बाहेर'

शेलार यांच्याकडे ठाणे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्याबाहेरील काही शहरांच्या महानगर पालिकेचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे ठाणे तसेच इतर शहरांमध्ये त्यांना व्यस्थ ठेवून त्यांना मुंबई पासून दुर करण्याचा हा डाव आहे का अशी चर्चा आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

( संपादन - सुमित बागुल )

is ashish shelar purposely kept away from BMC election 2022 question asked in political fraternity

loading image
go to top