रात्रीची शांततेची वेळ पाहून टोळी साधते आपला डाव, लोकहो सावधान 'बच्चा चोर गॅंग' झालीये सक्रिय

रात्रीची शांततेची वेळ पाहून टोळी साधते आपला डाव, लोकहो सावधान 'बच्चा चोर गॅंग' झालीये सक्रिय

मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण मुंबईत एक भुरटी टोळी आपले हातपाय पसरतेय. या भुरट्या टोळीची नजर तुमच्या लहानग्यांवर आहे. त्यामुळे तुमचं जर तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष झालं तर ही टोळी तुमच्या मुलांना उचलून घेऊन जाऊ शकते. या टोळीमुळे मुंबईत पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबईत थैमान घालणाऱ्या या टोळीचे नाव आहे 'बच्चा चोर गॅंग'. गेल्या एका आठवड्यात मुंबईत एका वर्षाआतील दोन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडल्यात. त्यामुळे तुमचं तुमच्या लहानग्यांवरून थोडं जरी दुर्लक्ष झालं तर होत्याच नव्हतं होईल. धक्कादायक बाब म्हणजे ही टोळी मुलांना पळवून त्यांना काही हजारांना विकतेय. 

'त्या' मुलीला पंधरा हजारांना विकलं 

मुंबईतील चारकोप पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक जोडपे आपल्या लहान मुलीसोबत झोपले होते. मध्यरात्री सडे तीन वाजताच्या सुमारास आईला जाग आली तेंव्हा त्यांची मुलगी गायब असल्याचं समजलं. त्या दोघांनी आसपास बराच शोध घेतला, सकाळपर्यंत शोध घेतला मात्र त्यांची एक वर्षाची चिमुकली कुठेच सापडली नाही. शेवटी त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. चारकोप पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी आपली फिर्याद नोंदवल्यावर पोलिसांनीही तात्काळ तीन टीम करून तपासाला सुरवात केली. चारकोप पोलिसांनी CCTV चेक केलेत आणि अखेर पोलिसांना ही एक वर्षाची चिमुकली अंधेरीत एका जोडप्याकडे आढळून आली. धक्कादायक बाब म्हणजे बच्चा चोर टोळीने त्या मुलीला पंधरा हजारांना त्या जोडप्याला विकल्याचं देखील समोर आलं. 

पंधरा वर्षे मुलं नव्हतं म्हणून... 

ज्या कुटुंबाकडे एक वर्षाची चिमुकली आढळून आली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सचिन आणि सुप्रिया येवले असं या दाम्पत्याचे नाव आहे. चारकोप पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर जी माहिती समोर आली ती पायाखालची जमीन सरकावणारी ठरली. येवले दाम्पत्याला १५ वर्ष मुलं होत नव्हतं, त्यांनी याबाबत पवार यांच्याकडे चर्चा केलेली. या चर्चेनुसार पवार यांनी फुटपाथवर झोपलेल्या तक्रारदार दाम्पत्याच्या १ वर्षीय मुलीला पळवून आणलं आणि येवले दाम्पत्याला विकलं असल्याचं उघड झालं. जुहूमध्ये देखील अशीच घटना घडली होती. तिथेही फुटपाथवर झोपलेल्या एका चार महिन्याच्या बाळाचं अपहरण करण्यात आलेलं. 

समोर येणाऱ्या माहितीनुसार ही टोळी फुटपाथवर किंवा गरीब वस्त्यांमध्ये नजर ठेऊन असते. रात्री सर्वजण झोपेत असताना ही टोळी आपला डाव साधते. त्यामुळे आपल्या लहानग्यांवर लक्ष ठेवा. कारण मुंबईत 'बच्चा चोर टोळी' पुन्हा सक्रिय झालीये.

bachcha chor gang active in mumbai beware and keep eye on your children

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com