esakal | मुस्लिम, मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणालेत...
sakal

बोलून बातमी शोधा

मुस्लिम, मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणालेत...

मुस्लिम, मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणालेत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने आज सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या उपसमितीचे अशोक चव्हाण अध्यक्ष आहेत. दरम्यान याचसंदर्भात अशोक चव्हाण यांनी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र सरकारची भाजू भक्कम आहे असं महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

दरम्यान अशोक चव्हाण यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत देखील वक्तव्य केलंय. मुस्लिम आरक्षणासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना निर्णय घेण्यात आलेला. आता याबाबत मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं अशोक चव्हाण म्हणालेत. माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांच्यासोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे देखील होते. एकनाथ शिंदे यांनी देखील मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय.

मोठी बातमी - समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज...

मराठा आरक्षणासंदर्भात काय म्हणालेत अशोक चव्हाण?  
"मागील झालेला कायदा टिकला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे. यासाठी आपण चांगली वकिलांची टीम तयार केलीये. यामध्ये जेष्ठ विधीतज्ज्ञ आपल्या सोबत आहेत. मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे, त्या अनुषंगाने तयारी सुरु आहे. १७ मार्चला सुनावणी सुरु होईल. याच बाबतीत चर्चा करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. योग्य पद्धतीने तयारी सुरु आहे. आपली बाजू भक्कम आहे.  मराठा आरक्षणसंदर्भात सरकार गांभीर्याने प्रयत्न करतंय. याचसंदर्भत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कुठेही काही त्रुटी राहता काम नये म्हणून आजची बैठक घेण्यात आली. 

मुस्लिम आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा -

"मुस्लिम आरक्षणाला शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांच्या घोषणेला दिला पाठींबा दिलाय. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. समान किमान कार्यक्रमानुसार आम्ही निर्णय घेऊ. काल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात पुढील कारवाई करण्याची घोषणा केली. आमचं सरकार सर्व समाजांच्या हिताचे निर्णय घेईल. असं एकनाथ शिंदे म्हणालेत. 

मोठी बातमी - तिला दुकानातून सामान घेण्यासाठी बोलावले आणि दाराची कडी लावली...

मुस्लिम आरक्षणामुळे OBC आणि मराठा आरक्षणावर परिणाम

दरम्यान मुस्लिम आरक्षणामुळे OBC आणि मराठा आरक्षणावर परिणाम होतील असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय. मुस्लिम आरक्षणासंदर्भात सरकार अध्यादेश काढणार असल्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणालेत. याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सरकार स्थापन करताना शिवसेनेनं काय-काय सेटिंग केलं असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.  

ashok chavan and eknath shinde on maratha and muslim reservation in maharashtra