तिला दुकानातून सामान घेण्यासाठी बोलावले आणि दाराची कडी लावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

पैसे देण्याच्या बहाण्याने तिला घरात ओढले

ठाणे - दुकानातून सामान आणण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कासीम सकीर अन्सारी (30) या आरोपीला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी बुधवारी (ता.26) दोषी ठरवत सात वर्ष सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा - समोरच्याला न समजता पाहा व्हाट्सअपचे मेसेज

संबंधित घटना भिवंडीत 31 जुलै 2014 रोजी घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले. भिवंडी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 31 जुलै रोजी सायंकाळी आरोपी कासीम याने शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय पीडित मुलीला दुकानातून सामान आणण्यासाठी बोलावले. तसेच पैसे देण्याच्या बहाण्याने तिला घरात ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घडलेला प्रकार पीडितेने पालकांना सांगितल्यावर याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - बनावट कागदपत्रांच्या मदतीने नोकरीत बढती

त्यानुसार कासीम याला अटक देखील करण्यात आली होती. याप्रकरणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला न्या. वैष्णव यांच्यासमोर आला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी केलेला युक्तिवाद, सादर केलेले पुरावे आणि पीडित मुलीसह सहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून कासीमला दोषी ठरवले. त्यानुसार त्याला सात वर्ष सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 
 

web title : Prisoner arrested for torturing minor girl


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoner arrested for torturing minor girl