मृताचा खोटा कोरोना अहवाल बनवल्याचे उघड; पनवेलमधील महिला वकील मृत्यू प्रकरण

Fake corona report
Fake corona reportsakal media

पनवेल : महिला वकील अश्विनी थवई मृत्यूप्रकरणी (Ashwini Thawai death) पनवेल व वाशीतील सहा डॉक्टरांवर (Doctors) पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर (Court Order) गुन्हा दाखल (police FIR) केल्याने खळबळ उडाली आहे. थवई यांच्या रक्ताचे नमुने (blood samples) वाशीतील यूडीसी सेटेलाईट लॅबोरेटरीसह चार लॅबकडे (pathology) तपासणीसाठी पाठविले होते. या चारही लॅबनी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह (report negative) असल्याचा अहवाल दिला आहे. यावरून गांधी रुग्णालयाने (Gandhi hospital) प्रकार लपविण्यासाठी तसेच अश्विनी यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे भासविण्यासाठी वाशीतील यूडीसी सेटेलाईट लॅबोरेटरीमधून मृताचा खोटा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल बनवून घेतल्याचे न्यायालयात उघडकीस आले आहे.

Fake corona report
मुंबई : ‘बीडीडी’तील वादग्रस्त घरे संचालकांच्या नावे होणार

अश्विनी या कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत गांधी रुग्णालयाने त्यावेळी यूडीसी सेटेलाईट लॅबोरेटरीचा आरटीपीसीआर अहवाल दाखवून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. अश्विनी थवई गेल्या मे महिन्यात पटेल रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर शस्रक्रिया केली जात असताना त्या अचानक अत्यवस्थ झाल्याने त्यांना पटेल रुग्णालयामधून गांधी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी अश्विनी यांना एक दिवस अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवून दुसऱ्या दिवशी त्यांना मृत घोषित केले होते. पटेल हॉस्पिटलमध्ये अश्विनीवर शस्रक्रिया करताना डॉ. धर्मेश मेहता यांनी अश्विनीला भूल दिली होती, तर डॉ. कृतिका पटेल या अश्विनीवर शस्रक्रिया करत होत्या.

अश्विनी यांना जास्त प्रमाणात भूल दिल्यामुळे तसेच शस्रक्रियेदरम्यान त्यांचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे अश्विनीचा मृत्यू पटेल रुग्णालयामध्ये झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच मृत अश्विनीला गांधी रुग्णालयानेही एक दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा आरोप करत मृत अश्विनीचे पती निशांत थवई यांनी पवनेल शहर पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी या प्रकरणात काहीच कारवाई न केल्याचा आरोप करीत निशांत थवई यांनी पनवेल न्यायालयात धाव घेऊन डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे अश्विनीचा मृत्यू झाल्याची तक्रार केली होती. तसेच पटेल व गांधी रुग्णालयाकडून प्रकरण दडपण्यासाठी केलेला प्रकार न्यायालयासमोर सादर केला होता. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com