Child Health : लहान मुलांना येतोय खोकला : अस्थमा की टीबी ?

Asthma Disease : बाधितांचे प्रमाण ७० टक्क्यांवर ; कोरोनानंतर झालीये रुग्णसंख्येत वाढ
कोरोनानंतर लहान मुलांमध्ये दम्याच्या प्रमाणात वाढ
कोरोनानंतर लहान मुलांमध्ये दम्याच्या प्रमाणात वाढesakal

Mumbai Children Health : दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ मुलांमध्ये खोकला हा केवळ टीबीच नाही, तर दमादेखील असू शकतो; मात्र लोकांमध्ये अस्थम्याविषयी माहितीचा अभाव (misdiagnosed) अजूनही आहे. त्यामुळे ६० ते ७० टक्के मुलांमध्ये दम्याचे निदान सरासरी एक वर्षाच्या विलंबाने होत आहे, असे अस्थमा तज्ज्ञांनी सांगितले.

डॉ. माने म्हणाले की, कोविडपूर्वी (Covid 19) जेजे रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज दोन ते तीन नवीन रुग्ण येत होते. आता कोरोनानंतर या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सध्या दिवसाला पाच ते सहा नवीन रुग्ण येत आहेत.

कोरोनानंतर लहान मुलांमध्ये दम्याच्या प्रमाणात वाढ
Hernia Disease Symptoms : हर्निया आजार पुरुष, स्त्रियांसह लहान मुलांनासुद्धा होऊ शकतो; कशी घ्याल काळजी?

जे. जे. रुग्णालयात दम्यासाठी विशेष ओपीडी चालवणारे सहयोगी प्रा. डॉ. सुशांत माने म्हणाले की, रुग्णालयात २०१३ पासून ही विशेष ओपीडी (OPD) चालवली जात आहे. पालकांमध्ये दम्याच्या लक्षणांबद्दल माहितीचा अभाव आहे.

जेजे हे रेफरल सेंटर आहे. संशयित दमा (asthma) असलेल्या ९० टक्के मुलांना इतर रुग्णालयातून रेफर केले जाते. यातील ६० ते ७० टक्के मुले एक वर्षाच्या विलंबाने पोहोचतात. डॉ. भट्टाचार्य म्हणाले की, देशातील सुमारे दहा टक्के मुले दम्याने त्रस्त आहेत. दरवर्षी अंदाजे २५० नवीन दम्याचे बालरुग्ण आढळतात.

कोरोनानंतर लहान मुलांमध्ये दम्याच्या प्रमाणात वाढ
Breathing Disease : ४४ टक्के नागरिकांना ‘ब्रेथलेस’ची बाधा!

दमा का होतो?

1 कुटुंबातील कोणाला दमा, ॲलर्जी (खोकला) (allergy) असेल, तर हा लहान मुलांना दमा होतो.

2 प्रदूषणामुळे २० टक्के लोकांमध्ये हा आजार होतो. वाहने, कारखान्यातील धूर किंवा बांधकामातून निघणारे कण यामुळे हा आजार होण्याचा धोका असतो.

3 घरामध्ये बुरशीचे प्रमाण असेल, तर त्यामुळेही हा आजार होऊ शकतो.

इनहेलर सर्वात प्रभावी उपचार

डॉ. माने यांनी सांगितले की, गोळी आणि सिरप यकृतात जातात आणि त्यानंतर रक्ताद्वारे श्वसनमार्गामध्ये पोहोचतात, अशा स्थितीत औषध तितकेसे प्रभावी ठरत नाही. इनहेलरच्या मदतीने, थोड्या प्रमाणात औषध दिले जाते. तसेच उपचार लवकर सुरू केल्यास आयुष्यभर इनहेलरची आवश्यकता नसते.

कोरोनानंतर लहान मुलांमध्ये दम्याच्या प्रमाणात वाढ
Tuberculosis Disease : ११९ रुग्णांच्या तपासणीत ३० जणांना लक्षणे,मेयोत क्षयरोगाचे भय वाढले

सावध राहणे गरजेचे

रात्री उशिरा खोकला (झोपल्यानंतर), पहाटेच्या खोकला (Cough Problem) , दोन आठवडे सतत खोकला येणे, श्वास घेताना किंवा खोकताना घरघर येणे. श्वास घेण्यात अडचण, श्वसनमार्गामध्ये वारंवार संक्रमण ही लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास पालकांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com