esakal | वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी वर्षा बंगल्यावर (varsha residance) भेट घेतली. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार आजारी होते. आज त्यांनी खूप दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. (at varsha residance cm uddhav thackeray & ncp chief sharad pawar meet )

पण राज्यातील राजकीय घडामोडी तसेच केंद्र सरकारकडून राज्याला कविड १९ संसर्ग काळात मिळणारी तोकडी मदत यावर चर्चा झाल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. लवकरच लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटना आणि अन्य घटकांकडून निर्बंध शिथील करण्याची मागणी होत आहे. कारण दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांची स्थिती नाजूक आहे.

हेही वाचा: मुंबईत लसीकरणाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडतेय एक मोठी गोष्ट

लसीकरण झालेल्यांसाठी लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे. एकूणच अनलॉकचा फेज सुरु करा, अशी समाजाची मागणी आहे. त्या विषयांवर सुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.