esakal | मुंबईत लसीकरणाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडतेय मोठी गोष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत लसीकरणाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडतेय एक मोठी गोष्ट

मुंबईत लसीकरणाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडतेय एक मोठी गोष्ट

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत आतापर्यंत राज्य सरकार, महापालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण सुरु होतं. पण पहिल्यांदाच नागरिकांच्या गटाने एकत्र येऊन लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई सेंट्रल आणि आग्रीपाडामधील अ‍ॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटने डॉ. रेड्डी लॅब बरोबर करार केला आहे. डॉ. रेड्डी लॅबकडून MCA ALM ला 'स्पुटनिक' (Sputnik )ही रशियन लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. लसीचे डोस देण्यासाठी मुंबई सेंट्रल (Mumbai central) आणि आग्रीपाडामधील (agriapada) अ‍ॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटने जवळच्या वोकहार्ट हॉस्पिटल बरोबर करार केला आहे. तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली लसीचे डोस दिले जातील. (Mumbai Agripada residents buy Sputnik for vaccination drive at nearby hospital MCA ALM group)

आतापर्यंत खासगी रुग्णालयामध्ये तसंच राज्य सरकार आणि महापालिकेमार्फत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस दिले जात होते. "आमच्या भागातील ८० इमारती ALM ग्रुपचा भाग आहेत. ६ ते ७ हजार रहिवाशी आहेत. अनेकांचे लसीकरण आधीच झाले आहे. आता ३ हजार रहिवाशांचे लसीकरण करण्याची आमची योजना आहे. आम्हाला रेड्डी लॅबकडून १ हजार लसीचे डोस सुरुवातीला मिळतील. त्यानंतर उर्वरित डोसही लवकर उपलब्ध होतील. ज्या नागरिकांचे लसीकरण बाकी राहिलं, त्यांच्यासाठी लसीकरणाचा आणखी एक राऊंड घ्यावा लागेल" असे MCA ALM चे सचिव मेहबूब पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईकरांना तूर्तास फायझरची लस नाही मिळणार कारण...

MCA ALM हा मुंबईतील पहिलाच असा ग्रुप आहे, जो स्वत: लस विकत घेऊन, आरोग्य केंद्राशी संधान साधून नागरिकांचे लसीकरण करत आहे. "MCA ALM ने आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्यांच्या विनंतीनुसार काम सुरु केलं. लसीकरणासाठी ALM ने जो पुढाकार घेतलाय, त्याला मदत करताना आम्हाला आनंद होत आहे" असे वोकहार्ट हॉस्पिटलचे डॉ. पराग रिनदानी म्हणाले.

हेही वाचा: 'माझं नाव सनी, मी घराबाहेर पडू का?' मुंबई पोलिस म्हणाले...

"प्रतिमाणसी लसीकरणासाठी १४०० रुपये आकारले जातील. एक स्वतंत्र मजला MCA ALM साठी ठेवला जाईल. सदस्यांमध्ये आम्ही फॉर्मचे वाटप केले आहे" असे मेहबूब पटेल यांनी सांगितले. स्पुटनिक लसीची किंमत भारतात १ हजार रुपयापेक्षा कमी आहे. पण अतिरिक्त पैसे जे आहेत, तो वोकहार्ट हॉस्पिटलचा सर्व्हीस चार्ज आहे.