
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील पथकर आणखी एका वर्षासाठी सवलतीच्या दरानेच आकारण्यात येणार आहे. राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सध्याचा २५० रुपयांचा पथकर दर कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली.