नोकरी गेली तरी घाबरू नका ! सरकारची 'ही' योजना देते दोन वर्षांचा पगार...

नोकरी गेली तरी घाबरू नका ! सरकारची 'ही' योजना देते दोन वर्षांचा पगार...

मुंबई : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे काही कंपन्या, उद्योगधंदे आणि व्यवसाय डबघाईला आले आहेत. याचा मोठा फटका या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. मागच्या २ महिन्यांमध्ये बहुतांश लोकांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. तर काही कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचं सावट आहे. मात्र अशातही एक जरा टेन्शन कमी करणारी बातमी समोर येतेय. केंद्र सरकार तुमची नोकरी गेल्यानंतरही तुम्हाला तब्बल २ वर्षांचा पगार देणार आहे.

देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे आणि कोरोनासाठीच्या लॉकडाऊनमुळे खिळखिळी झाली आहे. त्यात कंपन्या आणि व्यवसाय बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांना रोजगार मिळू शकत नाहीये. काही लोकांवर आपली नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. काही लोकांचे पगार कमी होत आहेत. तर काही लोकांना नोकरी जातेय की काय अशी चिंता सतावत आहे.

केंद्र सरकारची एक अशी योजना आहे ज्यामुळे तुमची नोकरी गेली तरी तुम्हाला पुढच्या २४ महिन्यांचा पगार मिळू शकणार आहे. मोदी सरकारच्या या योजनेचं नाव 'अटल बीमित व्यक्ती कल्याण' योजना असं आहे. या योजनेअंतर्गत जर तुमची नोकरी गेली तरी सरकारकडून तुम्हाला आर्थिक मदत पोहोचवली जाणार आहे.

गेल्या ९० दिवसांच्या सरासरी उत्पन्नाच्या २५ टक्के रक्कम बेरोजगार व्यक्तीला मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ESIC विमा मिळतो आहे आणि दोन वर्षांपेक्षा कमी काळ ज्यांनी नोकरी केली आहे अशा कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र त्यासाठी डेटा बेसशी आधार आणि बँक डिटेल्स संलग्न असणं गरजेचं असणार आहे.

असा घ्या योजनेचा लाभ:

जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर https://www.esic.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.

चुकीच्या वर्तणुकीमुळे कंपनीतून काढून टाकलं असेल तर या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. त्याशिवाय फौजदारी खटला दाखल झाला असेल किंवा कर्मचाऱ्यानं स्वेच्छानिवृती घेतली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळू शकणार नाहीये.

atal bimit vyakti kalyan yojana will give money if you loses your job

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com