
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) होणाऱ्या मॅरेथॉनसाठी अटल सेतू आठ तास बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. अटल सेतू जानेवारी २०२४ मध्ये वाहतूकसेवेत दाखल झाला आहे.