पेट्रोलचे दर ७ पैशांनी वाढले म्हणून अटलजींनी बैलगाडी मोर्चा काढला : उद्धव ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोलचे दर ७ पैशांनी वाढले म्हणून अटलजींनी बैलगाडी मोर्चा काढला : उद्धव ठाकरे

पेट्रोलचे दर ७ पैशांनी वाढले म्हणून अटलजींनी बैलगाडी मोर्चा काढला : उद्धव ठाकरे

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईच्या बीकेसी मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं. गेले काही दिवस सुरु असलेल्या मनसेच्या भोंग्याविरुद्धचे आंदोलन आणि भाजपकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री सभा घेत आहेत.

या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील भाजपसरकारवर महागाईवरून टीकेचं लक्ष्य केलं. तेव्हा बोलताना ते म्हणाले एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी हे पेट्रोलच्या किंमती वाढल्यावर संसदेवर बैलगाडी नेऊन मोर्चा काढला होता. हा मोर्चा काढला होता तो फक्त पेट्रोलच्या ७ पैसे दरवाढीमुळे काढण्यात आला होता. तेव्हाची भाजपा आज राहिली नाही. उद्धव ठाकरेंची हि टीका आजची नाही. यापूर्वी देखील अटलबिहारी वाजपेयी यांच्या या मोर्चावरून भाजप सरकारला लक्ष्य करण्यात आलं होतं.

आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती ऐतिहासिक स्तरावर जाऊन पोहोचल्या आहेत. पेट्रोलच्या किंमतींनी १२० रुपयांचा दर पार केला आहे. काही ठिकाणी १२३ रुपये प्रति लिटर प्रमाणे पेट्रोल विकले जात आहे. डिझेलचीही याच दिशेने आगेकूच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली होती .

मध्यंतरी विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपायी यांचा आधार घेतला. १९७३ मध्ये पेट्रोलच्या किंमती ७ पैशांनी वाढल्या होत्या, त्यावेळी वाजपायी बैलगाडीवरुन संसदेत पोहोचले होते. त्यांनी इंधनाच्या वाढलेल्या दरांचा विरोध केला होता. विरोधी पक्षांनी ४८ वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ शेअर करत भाजपला लक्ष्य केले. (petrol prices increased by few paisa Atal Bihari Vajpayee travelled Parliament bullock cart)

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हटलय की, '१९७३ मधील विरोधकांच्या निदर्शनाचे दुर्मिळ फोटो, जेव्हा पेट्रोलची किंमत ७ पैशांनी वाढली होती. अटल बिहारी वाजपायी बैलगाडीवरुन संससेत पोहोचले होते. जे आता अनेक निर्बंधामुळे शक्य नाही.' पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त आणि संपापले आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. लोकांच्या रोषांचा फायदा घेत विरोधक भाजपवर हल्लाबोल केला.

हेही वाचा: कोव्हॅक्सिन लस डेल्टाविरुद्ध किती प्रभावी? भारत बायोटेकनं केलं स्पष्ट

व्हिडिओला तृणमूल काँग्रेसचे नेता डेरेक ओब्रायन यांनीही शेअर केलं होतं. 'इतिहास, जेव्हा १९७३ मध्ये पेट्रोलच्या किंमती केवळ काही पैशांनी वाढल्या होत्या. या विरोधात अटल बिहारी वाजपायी बैलगाडी घेऊन संसदेत पोहोचले होते.' हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवरुन मिळाला असल्याचा खुलासा डेरेक यांनी केला आहे. आम आदमी पार्टीचे नेता आणि आमदार सोमनाथ भारती यांनीही हा व्हिडिओ शेअर करत मोदी सरकारवर टीका केली.

देशभरात इंधनाच्या किंमती वाढत असून त्या सर्वसामान्यांना परवडणासे झाले आहे. स्थानिक करांनुसार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोलच्या किंमती वेगळ्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्यास ४ मेपासून सुरुवात झाली होती. पेट्रोल-डिझेल वाढीचा सर्व क्षेत्रांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम पडत असतो. त्यामुळे सर्वांना याच्या झळा बसत आहेत. सर्व नागरिकांना दिलासा देतं का हे पाहावं लागेल.

Web Title: Atalbihari Vajpeyee Went On Bullock Cart Movement For Petrol Rise By 7 Paise Remembers Uddhav

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top