ATM : ‘एटीएम’मधून पैसे काढणे महागणार; एक मेपासून इंटरचेंज शुल्कात वाढ, रिझर्व्ह बँकेचा निर्णय
Mumbai News : बिगर-आर्थिक व्यवहारांसाठीचे शुल्कही एक रुपयाने वाढवण्यात आले आहे. त्यामुळे खात्यातील शिल्लक तपासण्यासारख्या व्यवहारांसाठी आता प्रत्येक वेळी सहा रुपयांऐवजी सात रुपये आकारले जातील.
Starting May 1, ATM withdrawal charges will rise as the Reserve Bank increases the interchange fee."Sakal
मुंबई : ‘एटीएम’मधून पैसे काढणे एक मेपासून महागणार आहे. ग्राहकांना मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.