MGM रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांवर हल्ला; तीन कर्मचाऱ्यांना अटक

अनिश पाटील
Sunday, 13 December 2020

महात्मा गांधी स्मारक रुग्णालय येथील वैद्यकीय अधिक्षकाला तेथील कर्मचा-यांनी मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला.

मुंबई - महात्मा गांधी स्मारक रुग्णालय येथील वैद्यकीय अधिक्षकाला तेथील कर्मचा-यांनी मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला. सहा कर्मचा-यांनी मारहाण केल्याचा आरोप असून त्यातील तिघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चंद्रशेखर शेट्टी(51), प्रवीण गमरे(50) व शंकर लांबाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणातील तक्रारदार हे रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक म्हणून कामाला आहेत. शुक्रवारी ते रुग्णालयातील लिफ्ट पकडून दुस-या मजल्यावर आले. त्यावेळी आरोपींनी तुम्ही आमचे काम केले नाही, असे बोलून त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी दणकदार वस्तूने हल्ला केला. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी आरोपींनी मारहाण केली. नाकाला, डाव्या डोळ्यावर, ओठाला व उजव्या हाताला मार लागला आहे. त्यानंतर तेथे सुरक्षा रक्षक धावून आला व त्याने तक्रारदार अधिक्षकांना उचलले. इतर प्रशासकीय अधिकारी आले व त्यांनी तक्रारदार अधिक्षकांना परळ येथील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी भादंवि कलम 353, 333, 341, 504, 506, 143, 144, 147, 148 व 149 अंतर्गत गुन्हा दाखल करण्ता आला.

लालबाग सिलिंडर स्फोट दुर्घटना | आणखी एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

प्राथमिक माहितीत तक्रारदार अधिक्षकांच्या कार्यालयात 5 डिसेंबरला बैठक झाली होती. त्यावेळी आरोपींनी बघुन घेण्याची धमकी त्यांना दिली होती. याप्रकरणाचे सीसीटीव्ही राज्य कामगार विमा आयुक्त कार्यालयालाही पाठवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर रुग्णालयात गस्त घातली असता शेट्टी व गमरे शनिवारी सापडले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तसेच गांधी रुग्णालयाच्या परिसरात लांबाडे सापडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

Attack on medical superintendent of MGM hospital Three employees arrested  

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on medical superintendent of MGM hospital Three employees arrested