esakal | संभाजीनगर नामांतराला केंद्र सरकारही मदत करेल, दरेकर यांचा शिवसेनेला चिमटा
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीनगर नामांतराला केंद्र सरकारही मदत करेल, दरेकर यांचा शिवसेनेला चिमटा

शिवसेनेला खरोखरच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करायचे असेल तर केंद्र सरकारच्या मदतीची काही गरज भासली तर आम्ही ती निश्चितपणे करू, असा चिमटा प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला काढला आहे.

संभाजीनगर नामांतराला केंद्र सरकारही मदत करेल, दरेकर यांचा शिवसेनेला चिमटा

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबईः शिवसेनेला खरोखरच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करायचे असेल तर तेथील महापालिकेने तसेच राज्य मंत्रिमंडळानेही तसा ठराव संमत करावा. या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या मदतीची काही गरज भासली तर आम्ही ती निश्चितपणे करू, असा चिमटा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला काढला आहे.

संभाजीनगरचे नामांतर असो किंवा अन्य कोणताही विषय असो, ठाकरे सरकारची सध्याची भूमिका फक्त सत्ता टिकवणे हिच आहे. केवळ सत्तेच्या लाचारीपोटी आपल्या सर्व भूमिका बासनात गुंडाळणे हीच शिवसेनेची भूमिका झाली आहे, अशी टिका  प्रविण दरेकर यांनी केली.

बाळासाहेबांच्या काळातील पूर्वीची धमक शिवेसनेत आता राहिली नाही. औरंगाबादच्या नामांतराला विरोध आहे असे आघाडीतील काँग्रेस या घटकपक्षाने जाहीर केले आणि त्यानंतर शिवसेनेने तलवार म्यान केली. आता मला बाळासाहेबांची शिवसेना दिसत नाही. सत्तेसाठी शिवसेना वेळोवेळी लाचारी पत्करत आहे. त्यामुळे नामांतराच्या विषयावरुन जर काँग्रेसचा दबाव आला तर शिवसेना काँग्रेससमोर नांगी टाकेल असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवसेना नेते संजय राऊत यांची वक्तव्ये अर्धवट माहितीच्या आधारे केलेली असतात. गेल्या पाच वर्षांमध्ये संभाजीनगर महापालिकेकडून कुठल्याही प्रकारचा शहराच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही. नामांतरावरून पालिकेकडून प्रस्ताव आल्यास राज्य सरकार त्याला मंजुरी देते आणि नंतर तो आवश्यक असल्यास केंद्राकडे पाठवला जातो. कुठलीही राजकीय प्रक्रिया समजून न घेता कोणतीही गोष्ट त्यांचा अंगाशी आली की ती भाजपवर ढकलायची अशी राऊत यांची भूमिका असल्याची टिका दरेकर यांनी केली. 

हेही वाचा- लसीचा साठा उपलब्ध झाल्यास मुंबईत 24 तासांत लसीकरण सुरू; BMC ची यंत्रणा सज्ज

जर शिवसेनेला आता खरोखरच संभाजीनगर असे नामांतर करायचे असेल तर तुमच्या महापालिकेने ठराव संमत करून तो मंत्रीमंडळातही मंजूर करून घ्यावा. केंद्राची काही मदत लागली तर आम्ही निश्चितपणे करू. आता काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात  यांनी नामांतरावरून विरोध केला आहे. म्हणून सरकारची अडचण होईल यासाठी शिवसेनेकडून पळवाट काढली जात आहे असा टोमणाही दरेकर यांनी मारला.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Aurangabad Central government help renaming Sambhajinagar pravin Darekar Shiv Sena

loading image