लसीचा साठा उपलब्ध झाल्यास मुंबईत 24 तासांत लसीकरण सुरू; BMC ची यंत्रणा सज्ज

समीर सुर्वे
Sunday, 3 January 2021

राज्यातील काही भागात कोविड लसीकरणाच्या रंगीत तालिमीला सुरवात झाली असून मुंबई महानगर पालिकेची तयारी पुर्ण झाली आहे

मुंबई : राज्यातील काही भागात कोविड लसीकरणाच्या रंगीत तालिमीला सुरवात झाली असून मुंबई महानगर पालिकेची तयारी पुर्ण झाली आहे.कोविड लसीचे साठणुक केंद्र आणि लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले आहे. लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर 24 तासाच्या पुर्व सुचनेने लसीकरण सुरु केले जाऊ शकते असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

कांजूरमार्ग येथे पाच हजार चाैरस फुटाच्या जागेत महापालिकेने मुख्य लस साठवणुक केंद्र तयार केले आहे. तर, परळ येथील केई,म,शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय,मुंबई सेंट्रल येथील बाई य.ल.नायर रुग्णालय,विलेपार्ले येथील डॉ.आर.एन कुपर रुग्णालय,वांद्रे येथील भाभा रुग्णालय आणि सांताक्रुझ येथील व्ही.एन देसाई,कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या रुग्णालयांसह पुर्व उपनगरात घाटकोपर येथील राजावाडी केंद्रात लसीकरण केले जाणार आहे.या सर्व ठिकाणी आज पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी पाहाणी करुन तयारीचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त देविदास क्षीरसागर,वैद्यकिय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ.रमेश भारमल, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमरे उपस्थीत होत्या.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आठ लसीकरण केंद्रासह साठवणुक केंद्राची तयारी पुर्ण झाली आहे. ही लस 2 ते 8 अंश तापमानाला साठवावी लागणार आहे. तसेच, वाहतुकही याच तापमानाला करावी लागणार आहे.त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आवश्‍यकता भासल्यास उणे २५ ते १५ अंश तापमानातही लस साठविण्याची तयारी महापालिकेने केली आहे. लसीकरण मोहीमेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
----
आरोग्य कर्मचाऱ्यांपासून सुरवात
पहिल्या टप्प्यात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.अशा 1 लाख 25 हजार कर्मचाऱ्यांची नोंद महानगर पालिकेने केली आहे.दुसऱ्या टप्प्या पासून लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.यात निम वैद्यकिय कर्मचारी, कोविड संदभार्गत काम केलेले पालिकेचे आणि खासगी सफाई कामगार,इतर फ्रंट लाईन कर्मचारी,पोलिस,बेस्ट आणि राज्य परीवहन सेवेचे कर्मचारी असे 5 ते 6 लाख जणांचे लसिकरण करण्यात येणार आहे. तीसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील नागरीक आणि सहाव्याधी आणि दिर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.

Vaccination will start in Mumbai within 24 hours if stock of vaccine becomes available BMC system ready

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccination will start in Mumbai within 24 hours if stock of vaccine becomes available BMC system ready