औरंगाबादेतील विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, शिवशाहीच्या नावानं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chitra wagh
औरंगाबादेतील विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, शिवशाहीच्या नावानं...

औरंगाबादेतील विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, शिवशाहीच्या नावानं...

मुंबई : एकतर्फी प्रेमप्रकरणातून १९ वर्षीय विद्यार्थ्यीनीचा औरंगाबादमध्ये चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. शिवशाहीच्या नावानं राज्य कारभार करणाऱ्यांची ही हतबलता आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (Aurangabad Chitra Wagh angry over girl student murder case)

"औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून केल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. त्या दुर्दैवी विद्यार्थिनीला २०० फूट ओढत नेल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. काय हे सुसंस्कृत महाराष्ट्राचे दुर्दैव आणि शिवशाहीच्या नावाने राज्यकारभार करणाऱ्यांची हतबलता…" अशा आशयाचं ट्विट करत ते राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग करत सवाल विचारला आहे.

हेही वाचा: 'मंकीपॉक्स' महामारीचं स्वरुप धारण करेल का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात?

औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयात ही विद्यार्थिनी बीए प्रथम वर्षाला शिकत होती. कॉलेजच्या परिसरात आलेल्या एका युवकाने तिला दोनशे फूट ओढत नेत चाकूने भोसकून हत्या केली. यापूर्वी युवक व विद्यार्थिनीमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरात एकाच दिवशी दोन खून झाल्याने खळबळ माजली आहे.

Web Title: Aurangabad Chitra Wagh Angry Over Girl Student Murder Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..