
विरार : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत माती व दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. हे धारण आता ८०% पूर्ण झाले असून धरणातून वसई विरार महानगरपालिकेला १९० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे.